शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:05 IST

गणेश देशमुख हे रविवारी (दि. २०) दुचाकी (एम.एच. २०, डी.वाय. १९१७)ने ए.एस. क्लबमार्गे कमळापूरकडे चालले होते. तनवाणी शाळेजवळ ...

गणेश देशमुख हे रविवारी (दि. २०) दुचाकी (एम.एच. २०, डी.वाय. १९१७)ने ए.एस. क्लबमार्गे कमळापूरकडे चालले होते. तनवाणी शाळेजवळ दुचाकी घसरून ते गंभीर जखमी झाले. शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

-------------------------

वडगावात ३१ दिव्यांगांना लसीकरण

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (दि. २३) आरोग्य विभागाच्या वतीने ३१ दिव्यांगांना कोविडची लस देण्यात आली. याप्रसंगी दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे, आरोग्यसेविका मीनल कांबळे, सय्यद, प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख पारसचंद साकला, जिल्हा सचिव जोतिराम जाधव, पश्चिम तालुकाध्यक्ष बदरीनाथ लघाणे, गजानन खांडगे, आदींची उपस्थिती होती.

------------------------------

बजाजनगरातील अतिक्रमण हटविले

वाळूज महानगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात विविध व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे बुधवारी (दि. २३) एमआयडीसीने हटविली. या चौकात विविध व्यावसायिकांनी रस्त्यालगतच्या जागेवर अतिक्रमणे केली होती. एमआयडीसीचे उपअभियंता बी. एस. दीपके यांनी या चौकातील रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला.

-------------------------

वाळूज महानगरात रिमझिम पाऊस

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात बुधवारी (दि. २३) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या परिसरातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. बुधवारी दिवसभर या परिसरात ढगाळ वातावरण होते.

---------------------------

जोगेश्वरीत प्रवेशद्वाराजवळ खड्डे

वाळूज महानगर : जोगेश्वरी ग्रामपंचायतीने उभारलेल्या प्रवेशद्वारासमोर खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रवेशद्वाराजवळच सदोष गतिरोधकही उभारण्यात आला आहे. खड्डे व गतिरोधकामुळे ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वार व चारचाकी वाहनधारकांना कसरत करीतच ये-जा करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यात आदळून दुचाकीस्वार जखमी होत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत.

-----------------------