शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत तिघे जागीच ठार

By admin | Updated: December 27, 2016 00:02 IST

पाटोदा/ नेकनूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या दोन अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

पाटोदा/ नेकनूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या दोन अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पाटोदा तालुक्यातील चुंबळी फाटा येथे कारच्या धडकेने बाप-लेकाचा मृत्यू झाला. दुसरा अपघात नेकनूर (ता.बीड) जवळील सफेपूर फाटा येथे झाला. कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील बाप-लेकापैकी मुलाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी येथील कल्याण शिंदे (५०) हे सुप्पा येथे शिक्षक आहे. सोमवारी सकाळी कल्याण शिंदे व त्यांचा मुलगा वैभव शिंदे (२०) हे दोघे दुचाकी (क्र . एमएच २३ एम - २०१०) वरून पिठ्ठीकडे जात होते. चुंभळी फाटा येथे समोरून येणाऱ्या कार (क्र.एमएच-१५ एफएफ ३९५७) ने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात कल्याण शिंदे व त्यांचा मुलगा वैभव शिंदे या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. कार एवढी भरधाव होती की, दुचाकीला उडवल्यानंतर ती एका झाडावर आदळली, तर दोघांचेही मृतदेह रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात आढळून आले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरा अपघात बीड तालुक्यातील नेकनूर जवळील सफेपूर फाटा येथे घडला. नेकनूर-मांजरसुंबा रोडवरून जात असलेल्या कारने दुचाकीला (क्र. एमएच-२३ यू-७४९८) ला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात राहुल शहादेव शिंदे (१५, रा.आहेर वडगाव ता.बीड) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील शहादेव शिंदे हे गंभीर जखमी झाले आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालक वाहनासह फरार झाला. या दोन्ही अपघाताची अनुक्रमे पाटोदा, नेकनूर ठाण्यात नोंद आहे. (वार्ताहर)