शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

गेवराई तहसीलमधील दोघे निलंबित

By admin | Updated: June 12, 2014 01:36 IST

गेवराई: येथील तहसीलमधील श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आदींचे अनुदान वितरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून तहसीलमधील दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

गेवराई: येथील तहसीलमधील श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आदींचे अनुदान वितरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून तहसीलमधील दोघांना निलंबित करण्यात आले आहे. वयोवृद्ध निराधार व्यक्तींना जगणे सुसह्य व्हावे, आर्थिक चणचण भासू नये, त्यांना आपल्या गरजा भागविता याव्यात व सामाजिक संतुलन राखले जावे, आदी उद्देशाने शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना राबविल्या जातात. आदी योजनांमधून विधवा, परित्यक्त्या, निराधार यांना महिना ६०० रुपये अनुदान शासनाच्या वतीने देण्यात येते. वंचितांना दर महिन्याला व वेळच्या वेळी अनुदान दिले जावे असा शासनाचा दंडक आहे. असे असले तरी गेवराई तहसीलमधून समाजातील वंचितांना वेळेवर अनुदान दिले जात नाही. लाभार्थ्यांना अनुदान देण्यात तहसीलमधील लाल फितीचा कारभार अडथळा ठरत असल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्त्यांतून करण्यात येत होता. यासाठी आंदोलनही झाले होते. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार करून येथील तहसीलमधील अव्वल कारकून एस.डी. कुलकर्णी व लिपिक एस.एस. पठाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९, ३ (१),(२), (३) नुसार कुलकर्णी व पठाण यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तडकाफडकी निलंबित केले. सामाजिक अर्थसाह्य योजनेचे अनुदान वितरित करण्यात हलगर्जीपणा केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाने कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.(वार्ताहर)