शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:53 IST

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शारदानगर-सगरोळी येथे बुधवारी दुपारी तीन वाजता घडली. रात्री उशिरा दोघांचे प्रेत सापडले.

लोकमत न्यूज नेटवर्कसगरोळी (ता. बिलोली): तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शारदानगर-सगरोळी येथे बुधवारी दुपारी तीन वाजता घडली. रात्री उशिरा दोघांचे प्रेत सापडले.क्षितिज बाबू लंके (वय १२, इयता सातवी, रा.रुद्रापूर), प्रमोद संदीप सोनकांबळे (वय १२, इयत्ता सातवी, रा. हंगरगा ता. मुखेड) असे मयत मुलांची नावे आहेत. बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर सेवाग्राम वसतिगृहात दुपारचे जेवण करुन क्षितिज, प्रमोद व त्यांचे दोन मित्र श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या बाजूला असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले. क्षितिज व प्रमोदला पोहता येत नव्हते. पाण्यात उतरताच ते गटांगळ्या खाऊन बुडून मृत्यू पावले.दरम्यान, सोबतच्या दोन मित्रांनी ही घटना शाळेत येऊन शिक्षकांना सांगितली. शिक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. सगरोळी येथील प्रा. आ. केंद्रात त्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. क्षितिजचे नातेवाईक हजर झाल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एम. सातमवार यांनी शवविच्छेदन केले. प्रमोदचे नातेवाईक रात्री उशिरापर्यंत पोहोचले नव्हते. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली.