शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

ट्रक लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांना अटक

By admin | Updated: September 19, 2014 01:13 IST

औरंगाबाद : ट्रकचालकास अडवून लूटमार करण्याच्या उद्देशाने धुळे येथून कार घेऊन औरंगाबादेत आलेल्या सशस्त्र टोळीतील दोन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद : ट्रकचालकास अडवून लूटमार करण्याच्या उद्देशाने धुळे येथून कार घेऊन औरंगाबादेत आलेल्या सशस्त्र टोळीतील दोन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक कार, दोन तलवारी आणि इतर महत्त्वाचा ऐवज हस्तगत करण्यात आला. ही कारवाई दौलताबाद टी-पॉइंटजवळ झाली.मोहंमद इरफान खान चौधरी महेबूब खान चौधरी (४०, रा. गणपत चाळ, साकी नाका, मुंबई), जावेदखान फकीर मोहंमद खान (३०, रा. तिरंगा चौक, धुळे), अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार शेख सादिक नूर मोहंमद (रा. मोळवी गंज, धुळे), जुबेर ऊर्फ शेरा (रा. मालेगाव) आणि गुलाब अण्णा (रा. कुसुंबा, ता. धुळे) हे पसार झाले. पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांना धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार हे ट्रक लुटण्यासाठी दौलताबाद टी-पॉइंट येथे थांबल्याची माहिती मिळाली. खंडागळे आणि त्यांच्या सहकारी तेथे पोहोचले. तेव्हा आरोपी हे श्रीराम फायनान्स कंपनीच्या गोडाऊनसमोर कार उभी करून बाहेर गप्पा मारत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहून ते अंधारात पळून जाऊ लागले. यावेळी इरफान खान आणि जावेद खान यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याजवळ मोबाईल हँडसेट, वेगवेगळ्या नावाचे वाहन चालविण्याचे परवाने आढळले. आरोपींच्या इंडिका कार क्रमांक एमएच-२० क्यू- ८९४७ मध्येही दोन धारदार तलवारी, एक दोरी, दोन निवडणूक ओळखपत्रे, एक पासपोर्ट फोटो, दोन मोबाईल हँडसेट, बांबूच्या लाठ्या, एक चार्जेबल बॅटरी, असे सुमारे १ लाख ९ हजार ५० रुपयांचे साहित्य सापडले. आरोपींची चौकशी केली असता १० सप्टेंबर रोजी त्यांनी पिलुखेडी, (ता. नरसिंगगड, जि. राजगड, मध्यप्रदेश) येथे दोरी लावून ट्रक लुटल्याचे सांगितले. त्या ट्रकमधील १८ लाख रुपयांचा धागा परस्पर विक्री करून ट्रक धुळे येथे बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचे सांगितले. पळून गेलेले आरोपी हे कुख्यात दरोडेखोर असून महाराष्ट्रासह परराज्यातही सादिकवर गुन्हे दाखल आहेत. सहायक आयुक्त बाबाराव मुसळे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, फौजदार खंडागळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.