लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कापूस विक्रीत अपहार केल्याच्या संशयावरुन मानवत येथील नागनाथ लेंगुळे याच्या खून प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी ६ जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन आरोपींना अटक केली आहे.मानवत येथील नागनाथ लेंगुळे याचा परभणी येथे झालेल्या मारहाणीनंतर दवाखान्यात उपचार घेत असताना २५ मे रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोन नगरसेवकांसह अन्य दोघांविरुद्ध मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, मारहाण परभणी येथे झाल्याने या प्रकरणाचा तपास नानलपेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. स्थानिक गुन्हा शाखेने यापूर्वी एका आरोपीस अटक केली होती. पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सनगले, बीट जमादार पुरी, उमर यांनी मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शहरातील खंडोबा बाजार परिसरातून सचिन पवार आणि मनोज पंडित या दोन आरोपींना याच प्रकरणात अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मानवत खून प्रकरणी दोन जणांना अटक
By admin | Updated: June 6, 2017 23:51 IST