शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

बाभूळगावला मिळाले दोन आमदार

By admin | Updated: October 21, 2014 13:47 IST

हिंगोली तालुक्यातील बाभूळगाव या गावाला मागील सहा महिन्यांत दोन आमदार मिळाले आहेत. यापूर्वी या गावचे दगडू गलंडे हे आमदार झाले होते.

हिंगोली : तालुक्यातील बाभूळगाव या गावाला मागील सहा महिन्यांत दोन आमदार मिळाले आहेत. यापूर्वी या गावचे दगडू गलंडे हे आमदार झाले होते.

बाभूळगाव हे गाव गलंडे यांच्यामुळे राजकीय क्षेत्राच्या नकाशावर आले होते. जनता दलाच्या काळात गलंडे हे आमदार झाले. मात्र नाकासमोर चालण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे व नंतर राजकारणात बदलत चाललेल्या बाबींनी त्यांना पुन्हा संधी दिली नाही. 
त्यानंतर अनेक वर्षे हे गाव राजकीयदृष्ट्या बाजूलाच पडलेले होते. बाभूळगाव येथीलच मूळ रहिवासी असलेले रामराव वडकुते यांनी कळमनुरी मतदारसंघात यापूर्वी प्रयत्न केला होता. मात्र ते अपयशी ठरले. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसवरच त्यांनी ठेवलेल्या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना विधान परिषदेवर संधी पक्षाने बहाल केली. त्यामुळे लोकांतून निवडून येण्याऐवजी थेटच त्यांच्या पदरात पक्षाने माप टाकले. त्यानंतर मागच्या वेळी कळमनुरी मतदारसंघात पुन्हा याच गावचे डॉ.संतोष टारफे हे बसपाकडून उभे होते. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी त्यांनी पुन्हा कॉंग्रेसकडून नशीब आजमावले आणि ते यशस्वी झाले. त्यामुळे बाभूळगावला त्यांच्या रुपाने तिसर्‍यांदा आमदार पद मिळाले. आता या गावाचे एक माजी तर दोन विद्यमान आमदार आहेत.
--------
गोरेगावकडे पाचवेळा राहिले आमदारपद
गोरेगावचा विक्रम मात्र नजीकच्या काळातही कोणी मोडेल, असे दिसत नाही. या एकाच गावाने आत्तापर्यंत तब्बल पाच आमदार दिले आहेत. त्यात बाबूराव पाटील गोरेगावकर, नारायण पाटील गोरेगावकर, चंद्रकांत पाटील गोरेगावकर, साहेबराव पाटील गोरेगावकर व नुकतेच पराभूत झालेले भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा समावेश आहे.