शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाईनमन जेरबंद

By admin | Updated: January 17, 2017 00:17 IST

तुळजापूर : विद्युत कनेक्शनसाठी सहा हजाराची लाच घेणाऱ्या पाचुंदा येथील ३३/ ११ केव्ही सबस्टेशनच्या दोन लाईनमनविरूध्द लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी दुपारी कारवाई केली़

तुळजापूर : विद्युत कनेक्शनसाठी सहा हजाराची लाच घेणाऱ्या पाचुंदा येथील ३३/ ११ केव्ही सबस्टेशनच्या दोन लाईनमनविरूध्द लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी दुपारी कारवाई केली़ ही कारवाई तालुक्यातील पाचुंदा येथे करण्यात आली असून, या प्रकरणी तंत्रज्ञ प्रदीप काकासाहेब साठे, तंत्रज्ञ नवीनकुमार इरलवार यांच्याविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील तक्रारदाराच्या वहिनींच्या घरात नवीन विद्युत कनेक्शन घ्यायचे होते़ त्यामुळे तक्रारदार आवश्यक कागदपत्रांसह अर्ज घेऊन तंत्रज्ञ (लाईनमन) प्रदीप काकासाहेब साठे यांच्याकडे देण्यासाठी गेले होते़ त्यावेळी साठे यांनी नवीन विद्युत जोडणीचा सर्वे देण्यासाठी व विद्युत कनेक्शन जोडणीसाठी सहा हजार रूपये लाचेची मागणी केली़ त्याबाबतची तक्रार तक्रारदाराने उस्मानाबादेतील लाचलूचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती़ या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक गवारे, उपाधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आसिफ शेख, पोनि बाळासाहेब आघाव, पोहेकॉ बसवेश्वर चनशेट्टी, रवींद्र कठारे, पोना पांडुरंग डंबरे, बालाजी तोडकर, नितीन सुरवसे, पोकॉ राहूल नाईकवाडी, नितीन तुपे, अमोल कुंभार चालक पोना धनंजय म्हेत्रे यांच्या पथकाने सोमवारी दुपारी पाचुंदा येथील ३३/११ सबस्टेशनच्या आवारात सापळा रचला़ त्यावेळी प्रदीप साठे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याची खात्री करण्यात आली़ तसेच ती रक्कम साठे यांचे सहकारी नवीनकुमार इरलावार यांच्यामार्फत स्विकारल्यानंतर पथकाने कारवाई केली़ या प्रकरणी तंत्रज्ञ प्रदीप साठे व नवीनकुमार इरलावार या दोघांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोनि बाळासाहेब आघाव करीत आहेत़ (वार्ताहर)