शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी अपघातात दोघे ठार

By admin | Updated: January 25, 2017 00:43 IST

परंडा :भीषण तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला़ तर दोघे गंभीर जखमी झाले़

परंडा : एका दुचाकीला जोराची धडक देऊन दुचाकीस्वाराने टमटमला समोरून जोराची धडक दिली़ या भीषण तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला़ तर दोघे गंभीर जखमी झाले़ हा अपघात मंगळवारी सायंकाळी परंडा- सोनारी राज्य मार्गावरील वीज कंपनीच्या उपकेंद्राजवळ घडला़किराणा दुकानातील दिवसभरातील कामकाज आटोपून उमेश बाळासाहेब टमटमे (वय-२६) हे मंगळवारी सायंकाळी भोंजागावी वालवड येथील मेव्हणा संतोष जगताप (वय-३२) यांच्यासह दुचाकीवरून भोंजाकडे (ता. परंडा) दुचाकीवरून निघाला होता़ परंडा - सोनारी राज्यमार्गावरील २२० केव्ही केंद्राजवळील काही अंतरावर वाल्हा (ता. भूम) गावाकडे सुभाष कांबळे आपले सहकारी कुंडलीक चव्हाण यांच्यासह दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या उमेश टमटमे यांच्या दुचाकीने सुभाष कांबळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेनतंर टमटमे यांची दुचाकी समोरून आलेल्या टमटमला समोरून धडकली. धडक इतकी भीषण होती की टमटमच्या समोरील काचाचा चक्काचूर झाला. या धडकेत उमेश टमटमे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या संतोष जगताप यांच्या पायाला, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीचा चालक सुभाष कांबळे यांच्या गुडघ्याला, हाताला जबर मार लागला असून, पाठीमागे बसलेल्या कुंडलिक चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे़ गंभीर जखमी दोघांवर परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.