शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादातून दोन गटांत मारहाण; सहा जखमी

By admin | Updated: March 17, 2016 23:59 IST

गंगाखेड : जागेच्या वादातून दोन गटात मारहाण झाल्याची घटना शहरातील रोशन मोहल्ला परिसरात १७ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

गंगाखेड : जागेच्या वादातून दोन गटात मारहाण झाल्याची घटना शहरातील रोशन मोहल्ला परिसरात १७ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास अंबाजोगाई येथे हलविले आहे.रोशन मोहल्ल्यातील शेख सादेक शेख इस्माईल कुरेशी, मो.इसाक शेख इस्माईल कुरेशी, शेख समीर शेख जमील कुरेशी व त्यांचे शेजारी राहणारे शेख मुस्तफा खाजामियाँ कुरेशी, शेख जावेद मुस्तफा कुरेशी, जकियाबी मुस्तफा कुरेशी यांच्यात जागेचा वाद होता. या वादातूनच गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन्ही गटांत मारहाण झाली. या मारहाणीमध्ये शेख जावेद यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. त्यांचा पायही फॅक्रचर झाला आहे. शेख जावेद यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोचार करुन अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी पाठविले आहे. तर शेख सादेक शेख समीर हे देखील गंभीर जखमी असून त्यांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जागेच्या वादातून ही घटना घडली असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता. (प्रतिनिधी)सेलूत संशयित दरोडेखोरास पकडलेपरभणी : सेलू शहरातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ संशयितरित्या फिरणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी गुरुवारी पहाटे ४ वाजता पकडले. सदर आरोपीला सेलू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पकडलेल्या आरोपीचे नाव जसविंदरसिंग हरिसिंग ढिल्लो असे आहे. सेलू शहरात पोलिस कर्मचारी गस्त घातल असताना गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास सेलू पोलिस ठाण्यात काही जणांनी माहिती देऊन सेलू-परभणी या रस्त्यावर जलशुद्धीकरण केंद्राजवळील कुऱ्हाडकर यांच्या आखाड्याजवळ एक चोर असल्याची माहिती दिली. या माहितीवरुन गस्त घालणारे कर्मचारी, स्थानिक कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने एका ४० वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले. संशयिताचे नाव जसविंदरसिंग हरिसिंग ढिल्लो असे असून तो सुमनापटियाला येथील रहिवासी आहे. हा आरोपी पंजाबी भाषेत बोलत असल्याची माहिती दिली. हाच व्यक्ती १६ मार्च रोजी मध्यरात्री उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी निवासस्थाने परिसरात फिरत होता.