शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

दोन माजी नगराध्यक्षांसह सीईओंविरूद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: June 11, 2014 00:21 IST

परभणी : एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार योजनेचा डीपीआर (डिलिट प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यासाठी शासन निकषापेक्षा ९४ लाख रुपये

परभणी : एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार योजनेचा डीपीआर (डिलिट प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यासाठी शासन निकषापेक्षा ९४ लाख रुपये अधिक देऊन शासकीय रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी मोंढा पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे़ परभणी ऩ प़ चे तत्कालीन नगराध्यक्ष प्रताप देशमुख, तत्कालीन नगराध्यक्षा जयश्रीताई खोबे, तत्कालीन मुख्याधिकारी बी़ व्ही़ निलावाड, कोंडिबा नरसू कुंभार यांच्याविरूद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे़ या योजनेचा संपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी आर्क असोसिएशन या कंपनीशी तत्कालीन नगराध्यक्ष प्रताप देशमुख व मुख्याधिकारी कोंडिबा नरसू कुंभार यांनी करार केला होता़ या कंपनीचे लक्ष्मीकांत सुर्वे व स्वप्निल श्रॉफ हे दोघे तथाकथित संचालक आहेत़ शासनाच्या नियमानुसार एकूण प्रकल्पाच्या १ टक्का किंवा जास्तीत जास्त ४० लाख रुपये शुल्क अहवाल तयार करण्यासाठी देण्याचे निर्देश आहेत़ हा करार झाल्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये २००९ मध्ये जयश्रीताई खोबे या नगराध्यक्षा झाल्या़ खोबे आणि तत्कालीन मुख्याधिकारी बी़ व्ही़ निलावाड यांनी या कंपनीस शासनाचे निर्देश न पाळता १ कोटी ३४ लाख रुपये म्हणजे ९४ लाख रुपये अधिक दिल्या गेले़ याप्रकरणी विजया मंकय्या कारंगलू यांनी माहिती घेतली आणि अ‍ॅड़ अविनाश चौधरी यांच्यामार्फत परभणी येथील न्यायालयात खटला दाखल झाला़ युक्तिवादानंतर न्यायालयाने संबंधिताविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश पारित केले होते़ त्यानुसार नवा मोंढा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून, चौकशी करून पोलिस न्यायालयास अहवाल सादर करतील़ (प्रतिनिधी)