शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दोन दिवस निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:15 IST

जायकवाडी येथून औरंगाबाद शहरासाठी पाणीपुरवठा करणाºया पंपगृहाच्या वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यास मनपा प्रशासन जबाबदार असून, याबाबत महावितरणच्या नावाने खापर फोडण्यात येत असल्याचा खुलासा सहायक कार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी येथून औरंगाबाद शहरासाठी पाणीपुरवठा करणाºया पंपगृहाच्या वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यास मनपा प्रशासन जबाबदार असून, याबाबत महावितरणच्या नावाने खापर फोडण्यात येत असल्याचा खुलासा सहायक कार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी केला आहे.मनपाने त्यांच्या विद्युत उपकेंद्राची डागडुजी (मेन्टेनन्स) वेळच्या वेळी केल्यास वीजपुरवठा खंडित न होता औरंगाबाद शहरास वेळेवर पाणीपुरवठा करता येईल, असे म्हणत गायकवाड यांनी मनपाचे कानही टोचले. बुधवारी त्यांनी मनपाच्या वीज केंद्राची पाहणी केली तेव्हा ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. महापारेशनच्या उपकेंद्रापासून मनपाच्या उपकेंद्रापर्यंत ३३ केव्ही वाहिनीची देखभाल कंपनीमार्फत करण्यात येते. मनपाच्या पाणीपुरवठा उपकेंद्राच्या सुरुवातीला महावितरणतर्फे अद्ययावत मीटरिंग यंत्रणा लावण्यात आलेली आहे. महापारेशन उपकेंद्र ते महावितरण मीटरपर्यंतची वीजपुरवठ्याची जबाबदारी महावितरण प्रशासनाची असते. मनपा उपकेंद्राची देखभाल व दुरुस्तीकडे, संचालन व सुव्यवस्थेकडे मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे वाहिनीवर किंवा मीटरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. बुधवारी मनपाच्या मीटरमधील केबल दोन ठिकाणी नादुरुस्त झाल्याने महावितरणच्या लाइनवरदेखील फॉल्ट झाला. केबल फॉल्ट हा आर्थिंग व इतर देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाल्याचे चाचणी अभियंता विवेक थोरवे यांनी सांगितले.