शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

दोन महिन्यांत दोन दरडी कोसळल्या

By admin | Updated: August 17, 2014 01:42 IST

श्यामकुमार पुरे, अजिंठा अजिंठा लेणीत मागील दोन महिन्यांत मुरुम व दगडांच्या दोन दरडी कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

श्यामकुमार पुरे, अजिंठाअजिंठा लेणीत मागील दोन महिन्यांत मुरुम व दगडांच्या दोन दरडी कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लेणी क्र. २ व २७समोर रात्रीच्या वेळी या छोट्या दरडी कोसळल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. लेणीच्या माथ्यावरील ९० ठिकाणचे दगड धोकादायक असल्याचा अहवाल तीन वर्षांपूर्वी देऊनही पुरातत्व विभागाने कुठलीच दखल घेतली नाही. या घटनांनंतर आता दगड काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अजिंठा येथे एकूण २६ लेण्या असून त्यांच्या माथ्यावर मोठे डोंगर आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या डोंगराची माती मोकळी होते. कधी मोठे तर कधी लहान लहान दगड, दरड, लेणीसमोर कोसळतात. हे प्रकार गेल्या तीन वर्षांपासून वाढले आहेत. १९९८ पासून ते सन २०१४ पर्यंत (१६ वर्षांत) भारतीय रेल्वे रिसर्च संस्था दिल्ली, सेंटर मायनिंग रिसर्च संस्था दिल्ली, जीएसआय सर्व्हे आॅफ इंडिया, भारतीय भूगर्भतज्ज्ञ नागपूर या संस्थांनी केलेल्या पाहणीत लेणीच्या माथ्यावरील ९० ठिकाणचे बोल्डर (दगड) धोकादायक बनल्याचे स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक आपत्ती, भूकंप, मोठ्या पावसामुळे हे दगड कधीही पडू शकतात म्हणून ते काढून टाकावे किंवा लेणीच्या डोंगर माथ्यावर स्टीलनेट जाळी लावावी, अशा सूचना (अहवाल) २०१० मध्येच देण्यात आल्या होत्या. मात्र, पुरातत्व विभागाने आतापर्यंत याकडे गांभिर्याने पाहिले नाही. मुख्य लेणीतील चार खांब बदलणारअजिंठा लेणीतील गुफा नं. १० सर्वांत महत्त्वाची आहे. सर्व प्रथम याच लेणीचा शोध लागला होता. या लेणीचे सर्वच १० खांब ठिसूळ झाले आहेत. येत्या चार महिन्यांत ट्रायल बेसवर ही ४ खांबे बदलण्यात येणार आहेत. पर्यटकांनी डोंगराच्या कडेने चालावेपर्यटकांनी डोंगराच्या कडेकडून चालावे जेणेकरून अशी घटना घडली तर कुणी पर्यटक जखमी होणार नाही. यासाठी पुरातत्व विभागाने जागोजागी बॅरिकेटस् लावले असल्याची माहिती डी.एस. दानवे यांनी दिली.दगड काढण्यासाठी प्रस्ताव सादरलवकरच टेंडर काढून धोकादायक दगड काढून घेण्यात येतील. काही ठिकाणी स्टीलची जाळी लावण्यासाठी आम्ही मागील आठवड्यात दिल्ली येथील भारतीय पुरातत्व विभागाकडे प्रस्ताव सादर केला असल्याचे अजिंठा लेणीमधील भारतीय पुरातत्व विभागाचे संरक्षक सहायक डी. एस. दानवे यांनी सांगितले.