शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

दोन एजंट ताब्यात

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

परभणी : तीन महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या पीएस पीएस इंडिया मल्टीट्रेड कंपनीच्या आणखी दोन

परभणी : तीन महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या पीएस पीएस इंडिया मल्टीट्रेड कंपनीच्या आणखी दोन एजंटांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींना १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीएस पीएस इंडिया मल्टीट्रेड कंपनीमार्फत दामदुप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखविले जात होते. कंपनीच्या प्रवक्त्यांनी अनेक एजंटही नेमले होते. या एजंटांना भरमसाठ पैसे दिले जात. पुणे, औरंगाबाद, लातूर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, बीदर, सोलापूर आदी ठिकाणी या कंपनीचे जाळे पसरविण्यात आले. शहरातील वैभवनगर भागात एक कार्यालयही उघडण्यात आले होते. परंतु मागील दोन महिन्यांपासून गुंतवणूकदारांना कोणताही परतावा न देता कंपनीच्या संचालक मंडळाने परभणी, पुणे व औरंगाबाद येथील कार्यालये बंद केले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी परभणी येथील कार्यालयास खेटा मारण्यास प्रारंभ केला. त्यातूनच मानवत तालुक्यातील नागरजवळा येथील कृष्णा ज्ञानोबा होगे यांनी कंपनीविरुद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक संदीप पाटील आणि अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्याकडे सोपविला. स्थागुशाने गतीने तपास करीत रविकुमार मुरलीधर राठोड आणि आनंद उत्तमराव वाघमारे या दोन एजंटांना अटक केली. त्यानंतर याच प्रकरणातील प्रकाश नामदेव राठोड (रा.मसला तांडा पाथरी) आणि पंडित गोपीनाथ चव्हाण (रा.टाकळगव्हाण ता.पाथरी) यांना ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही एजंट गावोगाव फिरुन लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडत होते. या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)पोलिसांचे आवाहनपीएस पीएस इंडिया मल्टीट्रेड कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी केले आहे.लाखोंचा अ‍ॅडव्हांसकंपनीने नेमलेले एजंट गावोगाव फिरुन लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडत असे. प्रत्येक महिन्याला या एजंटांची बैठक होत होती. या बैठकीत कंपनीच्या नवनवीन योजना एजंटांना सांगितल्या जात व जास्तीत जास्त पद्धतीने कशा पद्धतीने साखळी निर्माण करायची हे सुद्धा बैठकीत शिकविले जात असे. त्यांना यासाठी लाखो रुपये अ‍ॅडव्हांस म्हणून दिले जात असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.दस्तावेज हस्तगतपंडित गोपीनाथ चव्हाण यास ४६ हजार ६८८ रुपये व प्रकाश नामदेव राठोड यास ४ लाख ५० हजार रुपये देण्यात आल्याचे दस्तावेज स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केले आहेत.