शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बाराशे हेक्टर मका भुईसपाट

By admin | Updated: September 1, 2014 00:43 IST

सोयगाव : शहरासह तालुक्यात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर मका पिकाचे नुकसान झाले.

सोयगाव : शहरासह तालुक्यात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर मका पिकाचे नुकसान झाले. उभी मका जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रत्यक्ष नुकसानग्रस्त क्षेत्राची माहिती घेण्यासाठी सोमवार दि. १ पासून महसूल आणि कृषी विभाग संयुक्त पाहणी करणार असल्याचे तहसीलदार नरसिंह सोनवणे यांनी सांगितले.सोयगाव शहरासह परिसरात शनिवारी रात्री साडेदहा वाजेपासून बारा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. पावसासह जोरदार वादळी वारा असल्यामुळे उभा असलेले मका पीक जमीनदोस्त झाले. सोयगाव गलवाडा, आमखेडा परिसरात सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावरील मका पिकाचे नुकसान झाले. सोयगाव -शेंदुर्णी, सोयगाव, बहिरोबा, सोयगाव, फर्दापूर या रस्त्यालगतच्या शिवारात नुकसान जास्त प्रमाणात झालेले आहे. तसेच तालुक्यातील जरंडी लिंबायती बहुलखेडा, घोसला, बनोटी, तिडका, मुखेड, वाडी, पळाशी, रायरी, नायगाव, सोनसवाडी, वेताळवाडी, जंगल तांडा, फर्दापूर या गावातही वारा आणि पावसामुळे मका पिकाचे नुकसान झाले. याविषयी तालुका कृषी अधिकारी व्ही.एस. ठक्के यांच्याशी संपर्क साधला असता रविवार असल्यामुळे व पाऊस सुरू असल्यामुळे नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यात आलेली नाही; परंतु फर्दापूरपासून सोयगाव, बनोटीपर्यंत मका पिकाचे नुकसान झालेले आहे, असे ठक्के यांनी सांगितले. तर तहसीलदार सोनवणे यांना विचारणा केली असता महसूल आणि कृषी विभागामार्फत संयुक्त पाहणी सोमवारपासून करण्यात येईल, असे सोनवणे यांनी सांगितले. काल रात्री सोयगाव मंडळात ४० मि.मी., बनोटी ३५ मि.मी. पावसाची नोंद झालेली असून आतापर्यंत तालुक्यात ३९१ मि.मी. पाऊस पडलेला आहे.दरम्यान, निंबायती गावाजवळील पुलाच्या कामासाठी काढण्यात आलेला वळण रस्ता वाहून गेला. चार गावांची वाहतूक ठप्प झालेली आहे.सोयगाव तालुक्यात यंदा पावसाअभावी दीड महिना उशिरा पेरण्या झाल्या. कुणी बँकेचे तर कुणी सावकाराचे कर्ज काढून खरिपाची पेरणी पूर्ण केली. खरिपाची आंतरमशागत केली, मका सध्या जोमात आलेली असताना मक्याचा धांडा पक्का झालेला असताना वारा आणि मुसळधार पावसाने मका होत्याची नव्हती झाली. कालपर्यंत उभे असलेले हिरवे राण मात्र जमीनदोस्त झालेले होते. त्यामुळे चांगला पाऊस पडल्याच्या आनंदाने शेतात गेलेल्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.