शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबाद नगर पिरषदेच्या विकासकामांच्या निविदेचे कार्यादेश देण्यास तूतार्स खंडपीठाचा प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:05 IST

औरंगाबाद : खुलताबाद नगर परिषदेच्या विकासकामांसंदर्भातील २८ जूनच्या निविदेच्या अनुषंगाने तूर्तास कार्यादेश देऊ नये, असे आदेश मुंंबई उच्च ...

औरंगाबाद : खुलताबाद नगर परिषदेच्या विकासकामांसंदर्भातील २८ जूनच्या निविदेच्या अनुषंगाने तूर्तास कार्यादेश देऊ नये, असे आदेश मुंंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. आर. एन. लड्डा यांनी दिले आहेत. खंडपीठाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी अपेक्षित आहे.

खुलताबाद नगर परिषदेच्या २ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रियेच्या विरोधात खुलताबादचे कंत्राटदार मोहम्मद जुनेद मोहम्मद एजाज यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. नगर परिषदेने शहरातील विविध विकासकामांच्या निविदा नोंदणीकृत ठेकेदारांमार्फत मागविल्या होत्या. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंता मोहम्मद जुनेद मोहम्मद एजाज यांनी १५ ऑक्टोबर २० व २२ ऑक्टोबर २०२० रोजी यातील ८७ लाख रुपयांच्या निविदा भरल्या होत्या. दुसऱ्यांदा भरलेल्या निविदा तब्बल ८ ते ९ महिने नगर परिषदेने उघडल्या नाहीत. त्यांनी २३ एप्रिल रोजी उच्च न्यायालयात निविदा उघडण्यासाठी दाद मागितली असता नगर परिषद प्रशासनाने ३० जून रोजी या निविदा रद्द करून रस्ता अनुदान योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजना व नगरोत्थान या तीन योजनांचा निधी एकत्रित करून २ कोटी रुपयांच्या निविदा नव्याने मागविल्या.

पहिल्या व दुसऱ्या निविदेमधील सर्व कामे एकच असताना या दोन्ही निविदांमध्ये ७ लाख ९६ हजार ९८८ रुपयांची वाढ करण्यात आलेली होती. निविदा प्रक्रियेतील अनियमिततेसंबंधी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व संबंधित यंत्रणांना वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल करण्यात आले; परंतु यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने मोहम्मद जुनेद यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात सदर याचिका दाखल केली आहे.