शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हितासाठीच तूर खरेदी केंद्र!

By admin | Updated: January 21, 2017 00:11 IST

जालना : गत वर्षी १४ हजारांवर गेलेला तूरीचा प्रतिक्विंटल दर यंदा साडेतीन हजारावरच राहिलेला आहे.

जालना : गत वर्षी १४ हजारांवर गेलेला तूरीचा प्रतिक्विंटल दर यंदा साडेतीन हजारावरच राहिलेला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी मार्केट फेडरेशनच्या संचालकांना सूचना केल्यानंतर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांना केले.जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समिती, मार्केटिंग फेडरेशन, खरेदी विक्री संघ आणि नाफेड या संस्था शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊन काम करतात. काही दिवसांपूर्वी फेडरेशनच्या संचालक निलीमा केरकट्टा यांनी या केंद्रास भेट देऊन पाहणी केली होती. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या होत्या. केंद्राच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले होते. त्यानंतर पांढऱ्या तुरीबरोबरच याच दरात भगवी आणि काळी तूर खरेदी केली जावी, अशी सूचना राज्यमंत्री खोतकर यांनी केरकट्टा यांना केली होती. त्यांनी ती तात्त्काळ मान्य केली. सद्यस्थिती काळी तूर प्रतिक्विंटल ३४०० ते ३६००, भगवी तूर प्रतिक्िवंटल ३५०० ते ३७०० असा दर आहे. परंतु फेडरेशनच्या निर्णयामुळे हा तूर ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे खरेदी केला जाणार असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे. राज्यमंत्री खोतकर यांनी शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सुरु करण्यात आलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्राची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मोठ्या आकाराची चाळणी व त्यासाठी आकारले जाणारे पैसे या व इतर मुद्द्यांवर राज्यमंत्री खोतकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ योग्य चाळणीची व्यवस्था केली. यावेळी बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी आणि शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)