शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

कोल्ह्यातील बिबट्याने फाडला वनविभागाचा बुरखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 08:29 IST

नांदेड :गत दोन दिवसांपासून बिबटे आढळण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत़, परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या वनविभागाच्या लेटलतिफ कारभारामुळे तब्बल १३ तास उपाशीपोटी असलेला बिबट्या विहिरीत अडकून पडला होता़

नांदेड :गत दोन दिवसांपासून बिबटे आढळण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत़, परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या वनविभागाच्या लेटलतिफ कारभारामुळे तब्बल १३ तास उपाशीपोटी असलेला बिबट्या विहिरीत अडकून पडला होता़ कोणत्याही तयारीविना आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी संस्थाच्या प्रतिनिधींनी मदत केली़ ग्रामस्थांच्या गोंगाटामुळे बिथरणाऱ्या बिबट्याने डरकाळी फोडत वनविभागाच्या नियोजनशून्यतेचा बुरखाच फाडला़ मुदखेड तालुक्यातील कोल्हा येथे शिकारीसाठी आलेला बिबट्या शेतकऱ्याच्या पाठलागानंतर विहिरीत पडला़ जवळपास ४० फूट खोल विहिरीत सोमवारी मध्यरात्री पडलेल्या बिबट्याबाबत वनविभागाला रात्रीच माहिती मिळाली होती़, परंतु शासकीय काम अन् चार महिने थांब़़़अशा म्हणीप्रमाणे सकाळी दहा वाजता वनविभागाचे अधिकारी दाखल झाले़ यावेळी त्यांच्यासोबत स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधीही होते़ पोलिस फौजफाटाही मोठा होता़ परंतु कोणतेही नियोजन नसल्यामुळे फक्त पिंजरा घेवून वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते़ त्यानंतर जेसीबी, दोरी व इतर साहित्य आणण्यासाठी विलंब लागतच गेला़ त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनीही बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली़ त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला़ या दरम्यान, बिबट्याच्या मुखदर्शनासाठी आलेल्या अनेकांना पोलिसांना प्रसाद द्यावा लागला़ तीन वेळेस जेसीबीच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला़, परंतु दोरी तुटल्याने वेळेवर दरवाजाच बंद झाला नाही़ त्यात नागरिकांच्या गोंगाटामुळे बिथरलेला बिबट्या डरकाळी फोडत असताना, शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मोबाईलवर बिबट्याचे फोटो काढण्याची हौस भागवून घेतली़ धोकादायक पद्धतीने बिबट्याच्या भोवताल नागरिकांनी कडे केले होते़, परंतु त्यांना अटकाव करण्यास सर्वांनाच अपयश आले़ दुपारी तीन वाजता पिंजऱ्यात आलेल्या बिबट्याला थोड्या वेळानंतर जंगलात सोडले़, परंतु या प्रकारामुळे वनविभागाचा कारभार चव्हाट्यावर आला़ (प्रतिनिधी)१ लाख २० हजार हेक्टर वनक्षेत्र आहे़ एवढ्या मोठ्या वनसंपदेत वन्यप्राण्यांची संख्याही लक्षणीय आहे़, परंतु याबाबत नेमकी आकडेवारी वन विभागाकडेही नाही़ वन्य प्राण्यांची पाणवठ्यावर मोजणी होत असून एवढ्यात अशाप्रकारची कोणतीही मोजणी झाली नसल्याचे उपवनसरंक्षक सुजय डोडल यांनी सांगितले़ त्याचबरोबर वन्यप्राणी हे पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत नसून त्याची कारणे वेगवेगळी आहेत़जिल्ह्यातील जंगलात २१४ नैसर्गिक पाणवठे असून त्यामध्ये वन्यप्राण्यांना पिण्यासाठी मुबलक पाणी आहे असेही वनविभागाचे म्हणणे आहे़ परंतु सध्या नांदेडला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ मुखेड, कंधार, लोहा, हदगांव, भोकर या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना, वन्य प्राण्यांची अवस्था तर त्यापेक्षा वाईट आहे़बिबट्या पकडण्याची पद्धत चुकीची...बिबट्या पकडण्यासाठी फायबरचा आणि बिबट्याच्या आकारापेक्षा मोठा पिंजरा असणे आवश्यक आहे, परंतु वनविभागाने तब्बल १२ क्विंटल वजनाचा अवजड पिंजरा आणला होता़ नागरिकांच्या गोंगाटामुळे बिबट्या बिथरल्यास त्याच्या डोक्याला किंवा इतर अवयवांना ईजा होवू नये म्हणून वनविभागाने पिंजरा फायबरचा वापरावा, असे नियम घालून दिले आहेत़ परंतु त्याला हरताळ फासण्यात आला़ बिबट्यासारखा प्राणी रागिष्ट प्राणी पकडताना योग्य नियोजन आवश्यक असते़, परंतु विहिरीपासून बऱ्याच अंतरावर जेसीबी होती़ त्याद्वारे पिंजरा विहिरीत सोडण्यात येत होता़ विहिरीत हा पिंजरा सोडताना अनेकवेळा बिबट्या त्याखाली येण्याची शक्यता होती़ केवळ अंदाजावर तो पिंजरा खाली सोडण्यात येत होता़ बिबट्या जर त्याखाली आला असता तर, त्याला मोठी दुखापत झाली असती़ पिंजऱ्याला आतील भागातून सुरक्षेसाठी आवरण असणे आवश्यक असते, तेही नव्हते़ पिंजऱ्यात आल्यानंतर बिबट्याची शेपटी अनेकवेळा त्याच्या दरवाजात अडकून तुटते़ त्यामुळे त्याची लांबी आणि रुंदी याबाबतचे सर्व निकषही वनविभागाने पायदळी तुडविले़ पिंजऱ्यातील प्राण्याचे छायाचित्र घेवू नये, असे असताना, अनेक कर्मचारी अन् अधिकारी सेल्फी विथ बिबट्याची हौस भागवून घेत होते़