वाशी : भूम तालुक्यातील ईट परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच गोलेगाव (ता़वाशी) नजीक चोरट्यांनी कार अीडवी लावून चालकाला मारहाण करून प्लास्टिक दाणे असलेला ट्रक पळवून नेला़ ही लूटमारीची घटना रविवारी पहाटे घडली. पोलिसांनी सांगितले की, हुमनाबाद येथील रहिवाशी असलेला चालक मोहंमद जाकीर पाशा पटेल हा विशाापट्टन येथून ट्रकमध्ये (क्ऱएपी़ २८- टी़ई़ ८४३१) प्लास्टिकचे दाणे भरून भिवंडीकडे जात होता़ गोलेगाव फाट्याजवळ आल्यानंतर चार चोरट्यांनी निनावी क्रमांकाची कार अडवी लावून ट्रक थांबविली़ चालक पटेल यास खाली उतरवून मारहाण करून रोख ५००० रूपये काढून घेत प्लास्टिकचे दाणे असलेला ट्रक पळवून नेला़ याबाबत पटेल यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ तपास पोनि शिंदे हे करीत आहेत़ उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद आगाराच्या वाहतूक निरीक्षकांची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली़ ही घटना शुक्रवारी घडली असून, याबाबत रविवारी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ उस्मानाबाद येथील बसस्थानकात वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विजयकुमार राऊत यांनी शुक्रवारी सकाळी बसस्थानकातील पार्किंगमध्ये आपली दुचाकी (क्ऱएम़एच़२५-डी ८४४४) लॉक करून लावली होती़ दिवसभराच्या दरम्यान चोरट्यांनी लॉक तोडून दुचाकी लंपास केली़ याबाबत राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
चालकाला मारहाण करून ट्रक पळविली
By admin | Updated: September 1, 2014 01:07 IST