शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक दोन, दिसायला सारखेच; नंबर मात्र एकच

By admin | Updated: October 9, 2016 01:09 IST

औरंगाबाद : अवैध वाळू वाहतूकप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या ट्रक वर महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.

औरंगाबाद : अवैध वाळू वाहतूकप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या ट्रक वर महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. ही बाब खटल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अधिक तपास केला असता एकाच क्रमांकाचे दोन ट्रक असल्याचे समोर आले. याबाबतची माहिती सिल्लोडचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक यांना कळवून दुसऱ्या ट्रकवर सिल्लोड येथे कारवाई करून तो जप्त केला. पोलिसांनी मनावर घेतले की, कोणताही गुन्हा जास्त दिवस लपून राहत नाही. याचाच प्रत्यय पोलिसांच्या या कारवाईमुळे आला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्र्वी सिडको हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक (क्रमांक एमएच-२० सीटी ४४३२) हा पकडला होता. याबाबतची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास याबाबतची माहिती दिली. त्यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित ट्रक नियमानुसार वाळू वाहतूक करीत असल्याचे त्यांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी या ट्रकचे वजन केले असता क्षमतेपेक्षा अधिक टन वाळू वाहतूक करीत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी आरटीओला पत्र पाठवून याबाबत माहिती दिली. दरम्यान, आरटीओकडून त्या ट्रकवर कारवाई प्रस्तावित असताना पोलिसांनी पकडलेला नंबर आणि रंग सारखाच असलेला दुसरा ट्रक सिल्लोड येथे कार्यरत असल्याची माहिती खबऱ्याने सावंत यांना दिली. त्यानंतर सावंत यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सिल्लोड येथे पाठवून मिळालेल्या माहितीची खात्री केली असता पोलिसांनी पकडलेल्या क्रमांकाचा दुसरा ट्रक सिल्लोड येथे असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सिल्लोड येथे कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक यांच्याशी संपर्क साधून एकाच क्रमांकाचा दुसरा ट्रक सिल्लोड येथे असल्याचे कळविले. येथे पकडण्यात आलेल्या ट्रकची कागदपत्रे आणि छायाचित्र व्हॉटस्अ‍ॅपमार्फत त्यांना पाठविली. त्यानंतर सिल्लोड पोलिसांनी एकाच क्रमांकाचा दुसरा ट्रक जप्त केला. सिल्लोड पोलिसांनीही या ट्रकची माहिती महसूल विभागाला कळविली. तसेच आरटीओ प्रशासनाला पत्र पाठवून खऱ्या क्रमांकाचा ट्रक कोणता आहे, याबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. आरटीओकडून सविस्तर अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी सांगितले.