शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रॉंग साईडने आलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:04 IST

दौलताबाद : सोलापूर-धुळे महामार्गावरील फतियाबाद गावाजवळ ट्रक व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकने ऊस भरलेल्या ट्रॅक्टरला इतक्या ...

दौलताबाद : सोलापूर-धुळे महामार्गावरील फतियाबाद गावाजवळ ट्रक व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकने ऊस भरलेल्या ट्रॅक्टरला इतक्या जोराची धडक दिली की, यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आहेत. यात अपघातात ट्रकचालक व त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला असून, ट्रॅक्टरचालक व त्याचे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. हा अपघात मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घडला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक संतोष रणखांबे (वय ३०) व एकनाथ साबळे (२८, दोघेही रा. आडगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) हे धुळे येथून ट्रक (एमएच २० सीटी ८६५३) घेऊन आंध्रप्रदेशकडे जात होते. दरम्यान धुळे-सोलापूर महामार्गावरील फतियाबाद गावाजवळ येताच ट्रकने रॉंग साईडने येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिली. यात ट्रॅक्टरचालकाने प्रसंगावधान राखून घटनास्थळावरून पळ काढला. पण ही धडक इतक्या जोराची होती की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले; तर ट्रॉलीतील ऊस थेट ट्रकच्या केबिनमध्ये घुसला. त्यामुळे केबिनमध्ये बसलेले ट्रकचालक संतोष रणखांबे व एकनाथ साबळे हे गंभीर जखमी झाले. यात एकनाथ साबळे यांच्या डोळ्याला मार लागला आहे.

अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शरद बच्छाव, पचलोरे, के. पी. काबळे, सचिन त्रिभुवन यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही अपघातग्रस्त वाहने मंगळवारी दुपारपर्यंत महामार्गावरच होती. या घटनेची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यात झाली आहे. ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले, त्यात ट्रॅक्टरचालक व त्याच्यासमवेत असलेले अन्य साथीदार यांनी घटनास्थळावरून पळ काढला. ट्रॅक्टरच्या नंबरवरून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-----------

फोटो :