शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत झाड कोसळले; विद्यार्थी बालंबाल बचावले...

By admin | Updated: June 30, 2017 00:18 IST

औरंगाबाद: सिडको एन-३ येथील येथील वर्दळीच्या रस्त्यावर रेतीच्या ट्रकच्या धडकेत लिंबाच्या झाड कोसळल्याने झालेल्या भीषण घटनेत १२ वर्षीय बालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि शेकडो लोक बालंबाल बचावले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद: सिडको एन-३ येथील येथील वर्दळीच्या रस्त्यावर रेतीच्या ट्रकच्या धडकेत लिंबाच्या झाड कोसळल्याने झालेल्या भीषण घटनेत १२ वर्षीय बालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि शेकडो लोक बालंबाल बचावले. ही घटना सिडको एन-३ येथील एका गल्लीत दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.राहुल मच्छेवार (१२,रा.हनुमाननगर)असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो संत मीरा शाळेत सातवीत शिकतो.पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-३ येथील एका घराचे बांधकाम सुरू आहे.हे काम करण्यासाठी वाळूचा ट्रक आणण्यात आला होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास हा ट्रक अचानक रस्त्याशेजारील लिंबाच्या झाडाला धडकला आणि झाड खोडापासून मोडून रस्त्यावर पडले. यावेळी राहुल हा शाळेतून घरी जात होता. त्याच्या अंगावर झाडाची मोठी फांदी पडल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि तो खाली कोेसळला. यावेळी झाड पडण्यामुळे झालेल्या आवाजाने अनेक दुचाकीचालक आणि लोक घाबरुन पळत सुटले. काहींनी धावत्या दुचाकी सोडल्या तर काहींनी प्रसंगावधान राखून अनेकांना बाजुला ओढल्याने ते बालंबाल बचावले. या घटनेत मात्र एका मोपेडचे आणि महाविरतणच्या विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेनतर परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडित झाला. अपघात घडताच चालक ट्रक सोडून तेथून पसार झाला. घटनास्थळावरून ट्रक पुंडलिकनगर ठाण्यात नेण्यात आला.