शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

नळतोडणीमध्ये गैरप्रकार !

By admin | Updated: March 16, 2015 00:49 IST

उन्मेष पाटील, कळंब नगर परिषदेमध्ये सन २०११-१२ मध्ये हाती घेण्यात आलेल्या अनधिकृत नळजोडणी तोडण्याच्या कामामध्ये अपहार झाल्याची गंभीर तक्रार

उन्मेष पाटील, कळंब नगर परिषदेमध्ये सन २०११-१२ मध्ये हाती घेण्यात आलेल्या अनधिकृत नळजोडणी तोडण्याच्या कामामध्ये अपहार झाल्याची गंभीर तक्रार पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे बालोद्यान साहित्य घोटाळा, शौचालय घोटाळ्यानंतर हा आणखी एक घोटाळा समोर आल्याने न.प. वर्तुळात खळखळ उडाली आहे. शहरातील प्रदीप सुभाष पांचाळ यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करून माहिती अधिकाराच्या माध्यमातून हा घोटाळा समोर आणला आहे. शहरातील मुख्य नळवाहिनीवरील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याचा ठराव १६ फेब्रुवारी २०१२ च्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला होता. परंतु त्या ठरावामध्ये ‘सुमो हॉटेलसमोरील नाली साफ करणे’ या कामाचा समावेश नव्हता. तरीही या कामाचे बिल क्र. २७, २२ मार्च २०१२ रोजी सादर करण्यात आले व ते संबंधित ठेकेदारास अदाही करण्यात आले. या दोन्ही कामाचे बील एकरकमी व एकत्रितपणे अदाई करण्यासंदर्भात न. प. चे अभियंता जे. सी. बावळे यांनी ९ एप्रिल २०१२ रोजी टिप्पणी देऊन बिल अदा करण्यासंदर्भात टिप्पणी दिली होती. परंतु त्यापूर्वीच नऊ दिवस आधी म्हणजे ३१ मार्च २०१२ रोजी तत्कालिन मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर व नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने चेक क्र. ७७०७३६ ने बिल संबंधितास देण्यात आले. न.प. प्रशासन एवढ्यावरच थांबले नाही तर प्रशासनाने या कामाचे बिल अदा करण्यासाठी तत्कालिन मुख्याधिकाऱ्यांनी एकाच कामाचे दोन वेगवेगळ्या दिनांकाचे आदेश दिले आहेत. त्याहून कहर म्हणजे या कामांच्या बिलाच्या देयकानंतरच्या तारखेत हे आदेश काढण्यात आल्याचे कागदपत्रावरून दिसून येत आहे. सदरील काम हे मराठवाडा अर्थ मुव्हर्स या संस्थेच्या नावावर करण्यात आल्याचे कागदावर दाखविले आहे. परंतु याबाबत दुकाने निरीक्षक कळंब यांच्याकडे माहिती घेतली असता हे दुकान किंवा आस्थापना त्या व्यक्तीच्या नावावरच नसल्याचे समोर आले आहे. म्हणजे या कामाचे बिलही बनावट व्यक्तीच्या नावावर उचलण्यात आल्याचे स्पष्ट आहे. दुकाने निरीक्षकांनी ही संस्था मुश्ताक गफूर खाटीक (कुरेशी) यांच्या मालकीची असल्याचे लेखी कळविले आहे. कुरेशी हे सध्या कळंब न. प. चे उपनगराध्यक्ष आहेत, असेही पांचाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, हा प्रकार समोर आणल्यामुळे संबंधितांकडून आपल्या जिवितास धोका होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करून या प्रकरणी कळंब पोलीस यंत्रणेला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी पांचाळ यांनी ‘एसपीं’कडे केली आहे.