शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेशी पंगा घेणारा अजून पैदा झाला नाही

By admin | Updated: July 29, 2016 01:11 IST

औरंगाबाद : महापालिकेतील शिवसेनेचे आरोग्य सभापती आत्माराम पवार आणि भाजप गटनेते बापू घडामोडे यांचा पुतण्या अतुल घडामोडे यांच्यातील हाणामारीनंतर

औरंगाबाद : महापालिकेतील शिवसेनेचे आरोग्य सभापती आत्माराम पवार आणि भाजप गटनेते बापू घडामोडे यांचा पुतण्या अतुल घडामोडे यांच्यातील हाणामारीनंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत भाजपला गुरुवारी गर्भित इशारा दिला आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी गुरुवारी मनपा सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्या दालनात बैठक घेऊन शिवसेनेशी पंगा घेणारा अजून तरी पैदा झाला नसल्याचे सडेतोड उत्तर भाजपला दिले. येथून मागे सेना आणि भाजपात काय-काय झाले याचे दाखले देत कुणी कुणाला नामोहरम केले आहे, याचा संदर्भही दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. नगरसेवकाला मारहाण करण्याचे प्रकरण शिवसेनेच्या जिव्हारी लागले असून, त्याचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दानवे म्हणाले, शिवसेनेला धुणारा आणखीन जन्मला नाही. शिवसेनेने (भाजपचे नाव न घेता) कसे धुतले आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. बुधवारी रामनगर वॉर्डातील एका खाजगी हॉस्पिटलचा जैविक कचरा मनपाच्या घनकचरा संकलन करणाऱ्या रिक्षामध्ये भरला जात होता़ जैविक कचऱ्याच्या संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा असताना कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याचा प्रकार आरोग्य सभापती पवार यांच्यासमोर घडला़ त्यांनी या प्रकाराला आक्षेप घेतला; परंतु नगरसेवक तथा मनपातील भाजपचे गटनेते बापू घडामोडे यांचे पुतणे तेथे आले़ त्यांनी पवार यांच्याशी हुज्जत घातली़ थोड्याच वेळात त्याचे शाब्दिक चकमकीचे पर्यवसान हाणामारीत झाले़ पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मुंबईला गेल्याने पवार यांच्या जखमेवर मलम लावण्यासाठी बुधवारी कुणीही पुढे आले नाही. भाजप कार्यकर्त्यांचा मात्र घटनास्थळी जमाव आला होता़ त्यामुळे मनपात आणि शहरात शिवसेनेच्या आरोग्य सभापतींना भाजपने बेदम मारल्याची चर्चा होती. याच प्रकारामुळे सभागृह नेते जंजाळ यांनी आरोग्य विभागाची आज बैठक घेतली़ या बैठकीला जिल्हाप्रमुख दानवे यांनीही हजेरी लावली़ पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, शिवसेना मार खाणारी नाही तर देणारी आहे़ शिवसेनेला धुणारा अजून जन्मला नाही़ उलट मनपात शिवसेनेने त्यांना कसे आणि किती वेळेस धुतले हे सगळ्यांनाच माहीत असल्याचा संदर्भ भाजपचे नाव न घेता दानवे यांनी दिला़ आरोग्य विभागाने हॉस्पिटल्समधील कचरा संकलनाकडे लक्ष द्यावे. अन्यथा विभागातील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा या बैठकीत देण्यात आला.