शहीद भगतसिंह विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष सिटुचे राज्य सचिव कॉ. लक्ष्मण साक्रुडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. दामोधर मानकापे, कॉ. मंगल ठोंबरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात कॉ.साक्रुडकर, कॉ.मानकापे, कॉ.ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक यांनी महिनाभरापूर्वी कामबंद आंदोलन केले होते. याची दखल घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दीड ते दोन हजाराची वाढ करुन अन्य काही मागण्या मंजुर करण्यात आल्या आहेत. आठवडाभर संघटनेच्या वतीने आंदोलन केल्यामुळे शासनाच्यावतीने मागण्या मंजूर करण्यात आल्या असून गंगापूर तालुक्यातील जवळपास ५०० आशा कार्यकर्त्या व गट प्रवर्तकांना याचा लाभ मिळणार असल्याने या विजयी मेळावा घेण्यात आला. प्रास्ताविक ज्योती भोसले, सूत्रसंचालन शंकर नन्नुरे तर आभार कॉ.वैशाली शिंदे यांनी मानले.
फोटो ओळ
बजाजनगरात आशा व गट प्रवर्तकांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना कॉ.मंगल ठोंबरे. व्यासपीठावर लक्ष्मण साक्रुडकर, दामोधर मानकापे, ज्योती भोसले आदी.