शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

त्रिमूर्ती शाळा अखेर जमीनदोस्त

By admin | Updated: July 6, 2016 00:39 IST

औरंगाबाद : विश्वभारती कॉलनी येथील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर १९८४ पासून त्रिमूर्ती बालक मंदिर ही शाळा चालविण्यात येत होती.

औरंगाबाद : विश्वभारती कॉलनी येथील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर १९८४ पासून त्रिमूर्ती बालक मंदिर ही शाळा चालविण्यात येत होती. १८ जून रोजी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शाळेला सील ठोकले होते. मंगळवारी भर पावसात मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने भूखंडावरील संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त केले.जय विश्वभारती गृहनिर्माण संस्थेने १९८४ मध्ये महापालिकेच्या मालकीच्या ओपन स्पेसमधील ५२५ चौरस मीटर जागा त्रिमूर्ती बालक मंदिराला ९९ वर्षांच्या करारावर भाडेतत्त्वावर दिली. मागील तीन दशकांपासून या भूखंडावर शाळा सुरू होती. भूखंडाच्या मालकीचा वाद काही वर्षांपूर्वी उफाळून आला. वाद औरंगाबाद खंडपीठात गेला. २००५ मध्ये न्यायालयाने मनपाच्या बाजूने निकाल दिला. मागील ११ वर्षांमध्ये मनपा प्रशासनाने जागेचा ताबा घेतला नव्हता. दरम्यान, त्रिमूर्ती बालक मंदिर प्रशासन सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने त्रिमूर्ती बालक मंदिराकडे मालकीहक्क नसल्याने याचिका फेटाळून लावली. दरम्यान, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासमोर हे प्रकरण आले. प्रशासकीय अधिकारी महावीर पाटणी यांच्या उपस्थितीत त्रिमूर्ती बालक मंदिरला सील ठोकण्यात आले होते. शाळेत विद्यार्थ्यांशी संबंधित कागदपत्रे, बाकडे यासह इतर शैक्षणिक साहित्य होते. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत शाळेतील हे साहित्य दुसऱ्या जागेत स्थलांतरित करता यावे यासाठी महापालिकेने काही दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानंतरही साहित्य नेले जात नसल्याने अखेर आज पालिकेच्या अतिक्रमण पथकाने अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू केली. महापालिकेकडून कारवाईचा दिवस उजाडल्याने शाळा व्यवस्थापनाकडून शाळेतील बाकडे, फळा असे साहित्य इतर ठिकाणी नेण्यात आले. महापालिकेच्या ट्रकमध्ये हे साहित्य नेण्यात आले. इमारतीतील संपूर्ण साहित्य इतर ठिकाणी हलविण्यात आल्यानंतर इमारतीस पाडण्यास सुरुवात करण्यात आली. संततधार पावसामुळे कामकाजात अडथळा होत होता.