शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

By admin | Updated: June 5, 2014 00:12 IST

बीड: केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. या आपल्या लाडक्या लोकनेत्याला गमावल्याचे दु:ख लाखो कार्यकर्त्यांना अनावर झाले.

बीड: केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. या आपल्या लाडक्या लोकनेत्याला गमावल्याचे दु:ख लाखो कार्यकर्त्यांना अनावर झाले. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बंद पाळून या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. तसेच जिल्ह्यातील संस्था, कारखाने, संघटना आदी ठिकाणी गोपीनाथ मुंंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. होलसेल, रिटेल किराणा असो. बीड शहरातील मोंढा भागात होलसेल, रिटेल किराणा असोसिएशनच्या वतीने गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राधेश्याम अग्रवाल, मदन अग्रवाल, नीलेश लोढा, जयनारायण अग्रवाल, अमर नाईकवाडे यांच्यासह मोरया प्रतिष्ठान, जय माता दी मित्रमंडळाच्या पदाधिकार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी आपल्या भावना या नेत्याबद्दल व्यक्त केल्या. माजलगावात रॅली काढून श्रद्धांजली माजलगाव शहरामध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाची वार्ता समजताच येथील तरुणांनी शहरातून अभिवादन रॅली काढली. डॉ. आंबेडकर चौक, शिवाजी चौक, भाजपा कार्यालय येथे शोकसभा घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या तरुणांनी ‘मुंडे साहेब अमर रहे’ च्या घोषणा दिल्या. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी माजी आ. राधाकृष्ण होके पाटील, तालुकाध्यक्ष अरुण राऊत, नगराध्यक्ष अशोक तिडके, डॉ. सुरेश साबळे, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सोळंके, ज्ञानेश्वर मेंडके, तुकाराम येवले, खलील पटेल, एस. नारायण, राजेश मेंडके, नगरसेवक अमोल सोळंके, राम गायकवाड, बबनराव सोळंके, शरद कचरे, मनोज जगताप, फजलू अहेमद, अरुण अलझेंडे, शहाजी सोळंके, अशोक आळणे, शिवमूर्ती कुंभार, सतीश बोटे, लतीफ नाईक, कमल बजाज, राजश्री साळवे, ईश्वर होके, ईश्वर खुर्पे, सचिन डोंगरे, अनंत शेंडगे, अभिजीत पोटभरे, बाबा सोळंके, नितीन मुंदडा यांच्यासह सर्व पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. माजलगाव कारखाना येथील सहकारी साखर कारखान्यात केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कारखान्याच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारखाना संचालक मंडळ तसेच आ. प्रकाश सोळंके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, कामगार, कार्यकारी संचालक, खातेप्रमुख यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)