शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
4
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
5
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
6
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
7
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
8
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
11
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
12
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
13
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
15
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
16
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
17
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
18
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
19
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
20
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

वाढवणा परिसरात वृक्षतोड वाढली

By admin | Updated: June 16, 2014 01:15 IST

वाढवणा बु़ : बालाघाटच्या पायथ्याला असलेल्या परिसरासत वृक्षांची संख्या भरपूर आहे़ त्यात शासनाचे गायरानसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे़

वाढवणा बु़ : बालाघाटच्या पायथ्याला असलेल्या परिसरासत वृक्षांची संख्या भरपूर आहे़ त्यात शासनाचे गायरानसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे़ त्या गायरानावर बऱ्याच वर्षापूर्वी वनखात्याकडून वृक्ष लागवड केलेली आहे़ पण त्याकडे वनखाते हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे़ उदगीर तालुक्यातील वाढवणा बु़ खेर्डा, डावूळ, किनी, हिप्परगा, केसगीरवाडी, बेळसांगवी हे व इतर बरेच गाव बालाघाटच्या पायथ्याशी वसलेले गाव आहेत़ या भागामध्ये प्रत्येक गावाला मोठाले गायरान आहे़ विशेष करून किनी (यल्लादेवी) जवळच मल्लयअप्पाचे मोठे ३ डोंगरे असून, या डोंगरावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात शासनाने वृक्ष लागवड केली़ पण आज या गायरानावरील वृक्षांवर या भागातील व्यापारी दिवसाढवळ्या कुऱ्हाडी घालत आहेत़ वाढवणा व परिसरात जवळपास लाकडांचा व्यापार करणारे व्यापारी ३० ते ४० च्या घरात आहेत़ या व्यापाऱ्यांकडून वन विभागाने काही अधिकारी चेरीमेरी खाऊन त्यांच्या विनापरवाना वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करीत आहेत़ हे व्यापारी या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांचे फळांचे वृक्षसुद्धा विकत घेऊन त्याची रीतसर परवानगी न घेता सुद्धा तोड करून त्याची काळ्या बाजारात विक्री करीत आहेत़ सध्या हे व्यापारी आंबा, चिंच, जांभळी, बाभळी, कडू लिंबू एवढेच नाहीतर चंदनाच्या झाडांचीसुद्धा हे व्यापारी दिवसाढवळ्या तोड करीत आहेत़ वास्तिक पाहता शेतकऱ्यांच्या शेतातील झाड तोडण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावे लागते़ पण ते शेतकरी तसे करीतच नाहीत़ हे व्यापारी त्यांच्याकडून कवडीमोल दरात वृक्ष घेतात आणि ते ४०० ते ५०० रूपये प्रति क्विंटल प्रमाणे विकतात़ याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर या भागातील वनराई नष्ट होईल़ याबाबत वनखात्याचे अधिकारी वंजे यांना विचारले असता त्यांनी या व्यापाऱ्यावर कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली़(वार्ताहर)