शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

दररोज ७०० रुग्णांवर उपचार

By admin | Updated: October 20, 2016 01:41 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या शहरातील ३० पेक्षा अधिक आरोग्य केंद्रांत दररोज सरासरी ७०० तर दरवर्षी अडीच लाखांहून अधिक रुग्ण येतात व त्यांच्यावर यशस्वी उपचारही केले जातात.

महाकाळ येथे झाली होती मारहाणवर्धा : महाकाळ या गावात करणी, जादुटोणा प्रकरणी एका इसमावर प्राणघातक हल्ला करून मारण्याचा प्रयत्न झाला तर दुसरे प्रकरण पुन्हा उद्भवले. त्यातही मारहाण होण्याची शक्यता असल्याने गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांच्याशी संपर्क केला. महाराष्ट्र अंनिसच्या मध्यस्थीने करणी, जादुटोणाचे प्रकरण निवळले.शंभुजी यांनी तुकाराम यांच्याशी वाद करून तुने जादुटोणा करून माझ्या मुलीला मारले, असे म्हणत मारहाण केली. यात तुकारामला डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात येऊन सध्या नागपूर येथील रुग्णालयात ते कोमात आहेत. शंभुजी याला झालेल्या मारहाणीत पायाला फ्रॅक्चर झाले. या घटनेला १५ ते २० दिवस होत नाही तोच पुन्हा एक प्रकरण उद्भवले. यात श्यामराव हा आदिवासी समाजातील गरीब म्हातारा बकऱ्या चारण्याचे काम करतो तर पांडुरंग यांचा नातू जो महाकाळ येथेच राहतो. तो १२ वर्षाचा आहे. त्याला ताप येत होता. यात तो काही तरी बडबडायचा. त्याने श्यामरावचे नाव घेतले, असे सांगण्यात आले. कुण्या बाबाकडे (तांत्रिककडे) श्यामरावचे नाव निघाले. पांडुरंगजीने सर्व उपचार, तपासण्या करून पाहिल्या; पण आराम पडत नव्हता. यामुळे संशय अधिक बळकट होऊन श्यामरावचे नाव गावात सांगण्याची तोंडा-तोंडी माहिती होत गेली. यामुळे गावकऱ्यांना १५ ते २० दिवसांपूर्वीचा प्रसंगा आठवला. महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्यवाह प्रा. अजय सावरकर यांची शेती महाकाळला असल्याने त्यांना ही बाब कळली. त्यांनी लगेच दोन्ही प्रकरणे गजेंद्र सुरकार यांना कळविले. प्रकरणाची गंभीरता पाहून सरपंच आशा महाकाळकर, पं.स. सदस्य पुरूषोत्तम टोणपे, पोलीस पाटील सविता धोटे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विजय माजरखेडे, दोन्ही वादी प्रतिवादी, प्रतिष्ठित नागरिक, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे, तालुका कार्यवाह सुनील ढाले, कार्यकर्ते भीमसेन गोटे, तालुका कार्याध्यक्ष विजय कडू, अजय मोहोड यांच्यासह बैठक घेऊन वादी-प्रतिवादी यांना माणसशास्त्र, घडणाऱ्या घटना, उपचार पद्धती, जादुटोणा विरोधी कायदा, जादुटोणा, करणी अस्तित्वात नसल्याचे शास्त्रीय पुरावे गावातील संबंध, जादुटोणा करणीच्या संशयातून होणारी हत्या, न्यायालयातील घटनाक्रम आदीबाबत माहिती दिली. करणी, जादुटोणाचे अस्तित्व नाहीच, हे पटवून दिल्याने समझोता घडून आला. सामंजस्याने वागण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)