शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

तीनशे किमी उलटपायी प्रवास !

By admin | Updated: January 17, 2017 22:55 IST

तामलवाडी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पुणे-पंढरपूर-तुळजापूर असा जळपास ३०० किमीचा उलटपायी प्रवास फुरसुंगी (पुणे) गावातील बापुराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड (वय-५०) यांनी पूर्ण केला

तामलवाडी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पुणे-पंढरपूर-तुळजापूर असा जळपास ३०० किमीचा उलटपायी प्रवास फुरसुंगी (पुणे) गावातील बापुराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड (वय-५०) यांनी पूर्ण केला. त्यांचा मंगळवारी तामलवाडी, सांगवी (काटी), सुरतगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बापुराव गुंड यांनी ६ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री संत दगडूशेठ हलवाई गणपतीचे व माता तांबडी जोगेश्वरीचा आशिर्वाद घेवून पंढरीच्या विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतले. आणि मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे, यासाठी साकडे घालून उलटपायी प्रवास सुरू केला. त्यांनी घातलेल्या शर्टवर अन्याय, अत्याचार थांबवावेत, रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, पोलिसांवरील हल्ले थांबवावेत अशा विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुमारे तीनशे किमीचा प्रवास करून मंगळवारी सकाळी ९ वाजता गुंड तामलवाडी येथे दाखल झाले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे सुरतगाव, सांगवी (काटी) येथेही पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी शंकरराव मगर, मधुकर मगर, साधू शिंदे, अमर मगर, महादेव माळी, शंकर माने, श्रीकांत वडणे, आप्पाराव मगर, रामदास मगर, अंकुश मगर, जमीर शेख, दस्तगीर शेख, सुरतगाव, उपसरपंच, विठ्ठल गुंड, देवराज मित्रमंडळाचे आण्णासाहेब गुंड यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)