शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाअखेरपर्यंत उडणार बदल्यांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:33 IST

या आठवड्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा बार फुटेल, अशी खात्रीलायक माहिती आहे.

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये जिल्ह्यांतर्गत बदल्यांची आतुरता शिगेला पोहोचली आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा बार फुटेल, अशी खात्रीलायक माहिती असून उद्या बुधवारी ग्रामविकास सचिवांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद साधणार आहेत. त्यावेळी जिल्ह्यांतर्गत बदल्यासंबंधी सूचना मिळण्याची अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली आहे.बदल्यांसाठी जि.प.चा शिक्षण विभाग सज्ज असून, पहिल्या टप्प्यात १२५७ शिक्षक बदलीसाठी रांगेत आहेत. तथापि, अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षकांना बदलीसाठी आॅनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील मराठी माध्यमाचे ४९५ मुख्याध्यापक, १३९० पदवीधर शिक्षक, २ हजार ७९८ सहशिक्षक आणि उर्दू माध्यमाच्या २०७ शिक्षकांनी अशा एकूण ४ हजार ८९० शिक्षकांनी आॅनलाइन नोंदणी केलेली होती.शिक्षण विभागाने या सर्व शिक्षकांची आॅनलाइन मॅपिंग पूर्ण केली आहे. त्यानंतर बदलीच्या नवीन धोरणानुसार ग्रामविकास विभागाने संवर्ग- एक आणि संवर्ग- दोन यामध्ये नमूद प्रवर्गाच्या शिक्षकांकडूनही आॅनलाइन नोंदणी करून घेतली होती. यामध्ये संवर्ग- एकमध्ये (कंसातील आकडेवारी संवर्ग- दोनची वाचावी) औरंगाबाद तालुक्यात १७४ (८५), फुलंब्री तालुक्यात ६१ (६६), गंगापूर तालुक्यात १०५ (६६), कन्नड तालुक्यात १२५ (६५), वैजापूर तालुक्यात ८२ (४२), खुलताबाद तालुक्यात ४३ (३५), पैठण तालुक्यात ९८ (६२), सोयगाव तालुक्यात ४२ (०२) आणि सिल्लोड तालुक्यात ७५ (६६) असे एकूण संवर्ग- एकमध्ये ७६३ आणि संवर्ग- दोनमध्ये ४९४ अशा एकूण १२५७ शिक्षकांनी बदलीसाठी मागणी नोंदवलेलीआहे.औरंगाबाद जि.प. शिक्षकांच्या बदलीसाठी सज्ज असल्यामुळे पहिल्या टप्प्यात या जिल्ह्याचा क्रमांक लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. उद्या ग्रामविकास सचिवांसोबत यासंबंधीची चर्चा होईल. त्यानंतर लगेच पुढील सूचनेनुसार बदल्यांची प्रक्रिया राबवली जाईल.