शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देऊन शहराचा कायापालट करा

By admin | Updated: November 14, 2015 00:51 IST

आशपाक पठाण , लातूर लातूर शहरात स्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. शिवाय, डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आशपाक पठाण , लातूरलातूर शहरात स्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. शिवाय, डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय, पाणीटंचाईनेही उग्ररुप धारण केले असताना प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. यासंदर्भात आमदार अमित देशमुख यांनी मनपाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत शहराचा कायापालट करण्याची सूचना शुक्रवारी दिली. बाभळगाव येथे लातूर शहर महानगरपालिकेचे विभाग प्रमुख, महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, गटनेते नरेंद्र अग्रवाल, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोईज शेख, अ‍ॅड. समद पटेल, तालुकाध्यक्ष दगडूसाहेब पडिले आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांकडून माहिती जाणून घेतली. शहरात स्वच्छतेविषयी वाढत्या तक्रारी कमी झाल्या पाहिजेत, कर्मचाऱ्यांचा तुटवडा असेल तर तात्काळ रोजंदारीवर कर्मचारी घेऊन कामे सुरू करा. शहराच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता विभागाचा कर्मचारी पोहोचला पाहिजे, यासाठी नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्याचबरोबर पाणीटंचाई वाढली असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा, यासाठी मीटर बसविण्याची मोहीम सुरू करा. पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा, यासाठी नळाला मीटर बसविणे गरजेचे आहे. प्रथम नगरसेवक, कर्मचाऱ्यांच्या घरी मीटर बसवा. त्यानंतर ही मोहीम शहरभर राबवा, अशी सूचनाही आ. देशमुख यांनी केली.