शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वाढत असताना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 17:03 IST

अंबाजोगाईत रुग्णांची वाढती संख्या असतांनाही डॉक्टरांच्या होणाऱ्या बदल्या कोरोना काळात गैरसोयीच्या ठरणाऱ्या आहेत. 

ठळक मुद्देया डॉक्टरंच्या प्रतिनियुक्तीमुळे रुग्णालयात रुग्णसेवेवर विपरित परिणाम होणार आहे.

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तीन डॉक्टरांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तिकडे होत असल्याने या डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या होत आहेत. अंबाजोगाईत रुग्णांची वाढती संख्या असतांनाही डॉक्टरांच्या होणाऱ्या बदल्या कोरोना काळात गैरसोयीच्या ठरणाऱ्या आहेत. 

अंबाजोगाईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या २० दिवसांत ६०० पेक्षा जास्त रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात निघाले आहेत. अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयात अंबाजोगाईसह परळी, धारूर, केज, माजलगाव येथील रुग्णांची उपचाराची सोय याच रुग्णालयात आहे. अंबाजोगाईत असणारे कोविड रुग्णालय रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल झालेले आहे. याच रुग्णांना उपचारासाठी डॉक्टरांची मोठी कमतरता भासत आहे. अशा स्थितीत अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयातील नेत्र विभागाचे डॉ. एकनाथ शेळके, बधिरीकरण शास्त्र डॉ. प्रसाद सुळे तर औषध वैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. सदानंद कांबळे या तिघांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. 

यांच्या प्रतिनियुक्तीसाठी जळगाव परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे कारण वैद्यकीय प्रशासनने दिले आहे. यापूर्वीही ३४ डॉक्टरांच्या बदल्या मुंबई येथे करण्यात आल्या होत्या. त्याचा विपरित परिणाम आरोग्य सेवेवर झाला होता. त्यावेळी या डॉक्टरांच्या बदल्या रद्द करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी रुग्णालयाच्या दारात ठिय्या मांडून धरणे आंदोलन केल्याने त्या डॉक्टरांच्या बदल्या रद्द झाल्या होत्या. आता पुन्हा तीन डॉक्टरांच्या बदल्याचा प्रश्न पुढे आला आहे. या डॉक्टरंच्या प्रतिनियुक्तीमुळे रुग्णालयात रुग्णसेवेवर विपरित परिणाम होणार आहे.

डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करा - आ. नमिता मुंदडा अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयातील डॉ. एकनाथ शेळके, डॉ. प्रसाद मुळे, डॉ. सदानंद कांबळे यांच्या जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर होणाºया बदल्या रद्द कराव्यात असे पत्र आ. नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना दिले आहे. अंबाजोागईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी आ. मुंदडा यांनी केली आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडAmbajogaiअंबाजोगाई