शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ऑरिक सिटीत सात उद्योगांना जागांचे हस्तांतरण

By | Updated: December 2, 2020 04:09 IST

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक क्षेत्रात अर्थात ‘डीएमआयसी’मधील ऑरिक सिटीत नवीन सात उद्योगांनी जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ...

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक क्षेत्रात अर्थात ‘डीएमआयसी’मधील ऑरिक सिटीत नवीन सात उद्योगांनी जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ‘अनलॉक’च्या कालावधीत या सातही उद्योगांना जागा ताब्यात दिल्या आहेत. यात रशियन स्टील उद्योग ‘नोव्होलिपेत्सक’ (एनएलएमके) या बहुराष्ट्रीय कंपनीसह सहा स्थानिक उद्योगांचा समावेश आहे. ऑरिक सिटीमध्ये जागेचा ताबा घेतलेल्या स्थानिक उद्योगांमध्ये अलाइन्ट स्पेशालिटी केमिकल्स प्रा. लि., टूल टेक टुलिंग, ई ॲग्रो केअर मशिनरीज अँड इक्युपमेंट्स प्रा.लि., एस. एस. कंट्रोल्स, ५२ गेट सिटी ब्रेव्हिंग प्रा. लि, एरॉक्स टेक्नॉलॉजीस्‌ प्रा.लि. या उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगांच्या माध्यमातून ‘डीएमआयसी’च्या शेंद्रा इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये (ऑरिक सिटी) ट्रान्सफाॅर्मरसाठी विशेष स्टील निर्मिती, ऑटोमोबाइल, ऑक्सिजन, मद्यनिर्मितीच्या उद्योगांची भर पडणार आहे.

‘नोव्होलिपेत्सक’ (एनएलएमके) हा रशियन स्टील उद्योग औरंगाबादेत ४३ एकरवर प्रकल्प सुरू करणार असून दोन टप्प्यांत तब्बल ५ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतासह जगभरातील ३०-४० देशांत ही कंपनी स्टीलचा पुरवठा करते. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे दीड हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, तर स्थानिक सहा कंपन्यांनी या ठिकाणी ६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या प्रत्येक कंपनीला साधारणत: एक एकरचा प्लॉट देण्यात आला आहे. कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर सुमारे ४०० स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सध्या ऑरिक सिटीमध्ये ६२ कंपन्यांनी काम सुरू केले आहे. यात पर्किन्स, ह्योसंग या बहुराष्ट्रीय उद्योगांसह काही स्थानिक उद्योजकांचाही समावेश आहे.

चौकट...

ऑरिक सिटीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी सांगितले की, अनलॉकच्या कालावधीत ऑरिक सिटीमध्ये सहा स्थानिक उद्योग व ‘एनएलएमके’ या रशियन उद्योगांना जागांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. याशिवाय दोघा जणांना निवासी प्लॉटचाही ताबा देण्यात आला आहे. ‘डीएमआयसी’मध्ये ऑरिक सिटी ही अडीच हजार एकरावर विस्तारली आहे. यात उद्योग, व्यवसाय आणि निवासी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ‘डीएमआयसी’मध्ये देश-विदेशातील मोठमोठे उद्योग आणण्यासाठी उद्योग विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.