शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

'लिगो’ प्रयोगशाळेच्या जमिनींचे झाले हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 17:38 IST

शासकीय जमिनीच्या मुल्यांकनापोटी भारत सरकारने ६० लाख ११ हजार ९६७ रूपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. त्यानुसार जमिनीचा सातबारा आता या प्रोजेक्टसाठी भारत सरकार अणूऊर्जा विभागाच्या नावे करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे एकूण ५ हेक्टर ९४ आर. जमीनची  शासन निर्देशानुसार अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष व सचिव  यांच्या नावे सातबारामध्ये नोंद करण्यात आली आहे.शासकीय जमिनीच्या मुल्यांकनापोटी भारत सरकारने ६० लाख ११ हजार ९६७ रूपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत.

ऑनलाईन लोकमत 

औंढा नागनाथ (जि. हिंगोली ), दि. ५ : भारत सरकार अणूऊर्जा विभागाच्या वतीने स्थापन करण्यात येत असलेल्या ' लिगो इंडिया' या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी  महसूल विभागाच्या वतीने आज लिगो इंडियाच्या अधिका-यांना  जमिनींचा ताबा देण्यात आला. जमिनीचा ताबा मिळाल्याने आता प्रयोगशाळेच्या उभारणीच्या कामातील मोठा अडथला दूर झाला आहे.  

जगातील तिसरी लेझर ‘इंटरफेरोमेटर ग्रॅव्हीशनल व्हेव ऑबझर्व्हव्हेटरी प्रोजेक्ट’ म्हणजे अंतराळातील लक्षवेधी लहरींचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील जमिन उपयुक्त असल्याचा अहवाल या प्रोजेक्टसाठी दिला होता. त्या अनुषंगाने या प्रोजेक्टसाठी आवश्यक असणारी १७३ हेक्टर जमिनीची मागणी हिंगोली महसूल विभागाकडे नोंदविली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी हा प्रोजेक्ट लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने जमिन हस्तांतरणाच्या कारवाईस गती दिली होती. 

लिगो प्रोजेक्टने मागणी केलेल्या जमिनीपैकी गट क्रं. ४१२ क्षेत्रातील २४ हेक्टर २२ आर. पैकी ५ हेक्टर ३६ आर., गट क्रं. ४२५ मधील १६ हेक्टर ४६ आर. पैकी ६ आर. तसेच वाडीबेचीराग गावठाण क्षेत्रातील १ हेक्टर ४३ आर. पैकी ५२ आर. अशी एकूण ५ हेक्टर ९४ आर. जमीनची  शासन निर्देशानुसार अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष व सचिव  यांच्या नावे सातबारामध्ये नोंद करण्यात आली आहे.

 यासाठी शासकीय जमिनीच्या मुल्यांकनापोटी भारत सरकारने ६० लाख ११ हजार ९६७ रूपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. त्यानुसार जमिनीचा सातबारा आता या प्रोजेक्टसाठी भारत सरकार अणूऊर्जा विभागाच्या नावे करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी भंडारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी जमिनीचा ताबा लीगोच्या शास्त्रज्ञाना दिला आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी कुरवाडे, लिगोचे शास्त्रज्ञ मिलींद गोवर्धन, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मंडळ अधिकारी आनंद शिंदे, तलाठी विजय सोमटकर आदींची उपस्थिती होती.