शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याचे घर फोडून ९ लाखांचा ऐवज पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 01:06 IST

औरंगाबाद : शहरात सुरू असलेले घरफोड्या व चोऱ्यांचे सत्र थांबायला तयार नाही. पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने बंद घरांना चोरटे लक्ष्य करीत आहेत.

औरंगाबाद : शहरात सुरू असलेले घरफोड्या व चोऱ्यांचे सत्र थांबायला तयार नाही. पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने बंद घरांना चोरटे लक्ष्य करीत आहेत.शहरातील सुराणानगर येथील व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ६ लाख रुपये, असा एकूण ९ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.याविषयी अधिक माहिती देताना जिन्सी पोलिसांनी सांगितले की, सुराणानगर येथील रहिवासी असलेले प्लायवूडचे व्यापारी प्रदीप इंदलचंद गंगवाल (४६) यांच्या नातेवाईकाचे वाशिम येथे लग्न होते. त्यामुळे गंगवाल हे संपूर्ण परिवारासह ५ जुलै रोजी वाशिम येथे गेले होते. लग्न समारंभ आटोपून ते १३ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास औरंगाबादला परतले. त्यावेळी त्यांनी घर उघडले असता घरातील सामान अस्ताव्यस्त झालेले दिसले. चोरट्यांनी घर फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या घटनेची माहिती तातडीने जिन्सी पोलिसांना कळविली.पोलीस निरीक्षक श्याम वासूरकर, पोलीस उपनिरीक्षक पांचाळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा चोरट्यांनी टेरेसवर चढून खिडकीचा गज तोडून बंगल्यात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांमध्ये लहान मुलाचा समावेश असावा, असा पोलिसांना संशय आहे. आरोपींनी गंगवाल यांच्या बंगल्यातून रोख ६ लाख रुपये आणि ३ लाख ३९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे समजले. या घटनेप्रकरणी गंगवाल यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकामार्फत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही चोरी ५ ते १३ जुलैदरम्यान झालेली आहे. दरम्यानच्या कालावधीत पाऊस पडलेला असल्यामुळे चोरट्यांचा माग काढणे श्वानपथकाला शक्य झाले नसल्याचे पोलीस निरीक्षक वासूरकर यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक पांचाळ या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.