शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांनी दुपारी ४ वाजेनंतर केली दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उद्याने सर्व काही सुरळीत सुरू झाल्याने नागरिक सुखावले. शहराचे ठप्प झालेले ...

औरंगाबाद : शहरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उद्याने सर्व काही सुरळीत सुरू झाल्याने नागरिक सुखावले. शहराचे ठप्प झालेले अर्थचक्र सुरू झाल्याने व्यापार्‍यांतही उत्साह दिसून आला. वेळेच्या बाबतीत काही व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असल्यामुळे त्यांनी दुपारी चार वाजता तर काहींनी सात वाजता दुकाने बंद केली. प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच रात्री नऊपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, नागरिकांनी गर्दी टाळत कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनपाने केले आहे.

अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील अर्थकारण पुन्हा ठप्प झाले होते. मात्र राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनलॉक करताना औरंगाबाद शहराचा समावेश श्रेणी-१ मध्ये केला. त्यामुळे तब्बल ८७ दिवसांनी सोमवारी सकाळी सात वाजेपासूनच शहर पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले. शहरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उद्याने, पर्यटनस्थळे सर्व काही खुले झाले. व्यापारी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाजारपेठा सुरू होताच पहिल्याच दिवशी सकाळपासून खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. दुकाने, विविध प्रकारचे व्यवसाय सुरू झाल्याने व्यापारी वर्गदेखील सुखावलेला दिसून आला. शहरातील औरंगपुरा, गुलमंडी, शहागंज, सराफा बाजार, सिटी चौक परिसर, टीव्ही सेंटर, शहानूरमिया दर्गा, मुकुंदवाडी मार्केट, उस्मानपुरा, छावणी, रेल्वेस्टेशन या भागातील बाजारपेठ ग्राहकांनी फुललेली दिसून आली. जुन्या मोंढ्यात विविध प्रकारच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. काही व्यापारी संभ्रमात असून, त्यांनी दुपारी चार आणि सायंकाळी सात वाजता दुकाने बंद केली.

नागरिकांकडून कोराेनाच्या नियमांचे पालन नाही

शहरातील प्रमुख बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र बाजारपेठेत वावरणार्‍यांपैकी काही नागरिक बेपर्वाई करत विनामास्क दिसून आले. कोरोनाच्या नियमांचे पालन नागरिकांकडून होताना दिसून येत नाही.