शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी म्हणाले,‘आज उधार, कल नगद’

By admin | Updated: November 10, 2016 00:09 IST

बीड : ‘आज नगद, कल उधार’ अशा पाट्या व्यापारपेठेत ठिकठिकाणच्या दुकानांमध्ये दिसून येतात.

बीड : ‘आज नगद, कल उधार’ अशा पाट्या व्यापारपेठेत ठिकठिकाणच्या दुकानांमध्ये दिसून येतात. जास्तीत जास्त ग्राहकांनी रोखीचे व्यवहार करावेत, असा व्यापाऱ्यांचा हेतू असतो. बुधवारी ‘आज उधार, कल नगद’ असे उलटे चित्र पहावयास मिळाले. उधार न्या, पण हजार, पाचशेच्या नोटा नको, अशी विनंती व्यापारी ग्राहकांना करताना दिसून आले.काही नागरिकांनी चिल्लर करण्यासाठी मुद्दामहून आटोपशीर खरेदी करण्याचा प्रयत्न केला; परंतु मोजक्या व्यापाऱ्यांनीच हजार, पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारल्या. काही व्यवहार उधारी, उसनवारीवरही झाले. व्यापाऱ्यांनी ओळखीच्या ग्राहकांना उधारीवर साहित्य पुरविले. अनेक गृहिणींकडे किराणा सामानासाठी पैसे नव्हते. ‘ताई, वहिनी, हवे ते घेऊन जा, पैसे कोठे जाणार आहेत ? जेव्हा येतील तेव्हा द्या’ अशा उदार मनाने व्यापारी ग्राहकांची सरबराई करताना दिसून आले. मोठ्या किंमतीच्या नोटांना कोणीच स्वीकारण्यास तयार नव्हते. बँका, एटीएम बंद असल्याने नव्या पैशांची उपलब्धीही अशक्य होती. त्यामुळे ग्राहकांनीही उधारी-उसनवारीवर खरेदी केली. अनेकांनी डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करण्यावर भर दिल्याचेही व्यापारपेठेत पहावयास मिळाले.जुनी उधारी वसूलकाहींकडे अनेक दिवसांपासून उधारी थकित होती. एरवी दुकानदारांनी मागूनही उधारी न देणारे ग्राहक आज स्वत:हून उधारी देण्यासाठी येत होते. हजार, पाचशेच्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बदलण्याची सुविधा आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही जुनी उधारी वसुली होत असल्याची संधी न दवडता पैसे स्वीकारले. (प्रतिनिधी)