जालना : मंठा तालुक्यातील विडोळी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत तीन वर्षीय बालक ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली.विवेक मनोज अंभोरे (३) हा घरासमोर खेळत असताना ट्रॅक्टरचालक माणिक विठ्ठल दवणे (रा. लिंबा. ता पाथरी) याने निष्काळजीपणे भरधाव ट्रक्टरची धडक मुलास दिली. यात विवेक हा जागीच ठार झाला. या प्रकरणी संतोष तुकाराम मोरे (रा.विडोळी ता. मंठा) यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वसावे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
ट्रॅक्टरच्या धडकेत बालक ठार
By admin | Updated: February 9, 2016 00:23 IST