शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:04 IST

औरंगाबाद : पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्याचा बहाणा करून निराधार असलेल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ३१ ऑगस्ट ...

औरंगाबाद : पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्याचा बहाणा करून निराधार असलेल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्या आरोपीला या पीडितेने २४ ऑगस्ट रोजी राखी बांधली होती.

पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपी रामदास रामजी प्रसाद उर्फ पल्ल्या दादा (२५) यास अटक केली आहे. शहरात दोघी बहिणी राहतात. मोठी बहीण शहरातील खासगी रुग्णालयात नोकरी करते. यांच्या आईचे ११ वर्षांपूर्वी, तर वडिलांचे ४ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्या दोघींच्या शेजारी चुलते राहतात. मोठ्या बहिणीच्या तीन मित्रांपैकी एक आरोपी रामदास प्रसाद यास दोघींनी भाऊ मानले होते. त्यास २४ ऑगस्ट रोजी दोघींनी राखी बांधली. तेव्हा ओवाळणीसाठी पैसे नसून, १ तारखेपासून लहान बहिणीला पोलीस भरतीचे प्रशिक्षण देतो. तसेच त्यासाठी ट्रॅकसूट आणून देतो, असे आश्वासन देऊन तो निघून गेला. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता पीडितेची बहीण ड्युटीवर असताना आरोपी ट्रॅकसूट घेऊन घरी गेला. त्यास पीडिता नकार देत असताना मोठ्या बहिणीशी बोलणे करून देत तिला प्रशिक्षणासाठी परिसरातील मैदानाकडे घेऊन गेला. मैदानाच्या जवळ आल्यानंतर पाऊस सुरू होताच एका चारचाकी वाहनाला हात करून थांबवत त्यात बसवून तिला पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीमध्ये नेलेे. त्या ठिकाणी एका रूममध्ये घेऊन जात व्यायाम करण्यास लावला. त्यानंतर काही वेळाने अत्याचार केले असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह तपास अधिकारी उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी मुलीचा इनकॅमेरा जबाब घेत ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सुकन्या भोसले यांनी पीडितेला मानसिक आधार देत मदत केली.

चौकट..................

मोबाइलमध्ये शूटिंग

आरोपीने अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करतानाची व्हिडीओ शूटिंग केली असून, कोणाला घटनेची माहिती दिल्यास व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आरोपी व पीडितेला अत्याचार केलेल्या घटनास्थळापर्यंत अजय ठाकूर याने गाडीतून सोडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चौकट..............

आरोपी मुंबईतील गुन्हेगार

आरोपी रामदास प्रसाद मुंबईतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो काही मित्रांसोबत भाड्याने रूम घेऊन राहत होता. त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल असून, त्याचाही तपास पोलीस करत आहेत.