शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान उचलूनही शौचालय बांधले नाही

By admin | Updated: January 25, 2017 23:59 IST

लातूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी लातूर शहरातील ५ हजार ७०६ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर झाले

लातूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी लातूर शहरातील ५ हजार ७०६ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर झाले असून यातील २ हजार ६८९ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. तर २०१० लाभार्थ्यांचे बांधकाम सुरू आहे. परंतु, १००७ लाभार्थ्यांनी अद्याप बांधकामाला प्रारंभ केला नाही. अनुदान उचलूनही बांधकाम सुरू न केल्याने या लाभार्थ्यांना मनपाने नोटिसा पाठविल्या असून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तंबी देण्यात आली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत लातूर मनपाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून गुड मॉर्निंग पथक शहरात कार्यान्वित करण्यात आले आहे. ज्या भागातील नागरिक उघड्यावर शौचास जातात, त्या भागात गुड मॉर्निंग पथकाचा सकाळच्या प्रहरी ठिय्या आहे. मंगळवारी दीपज्योतीनगर भागात १५ नागरिकांना उघड्यावर शौचास बसल्याने त्यांना पकडून पोलीस ठाण्यात दिवसभर ठेवण्यात आले. त्यांच्याकडून हमीपत्र घेतल्यानंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, बुधवारी नांदगाव वेस परिसरात गुड मॉर्निंग पथकाचा ठिय्या होता. मनपाचा दवाखाना असलेल्या पटेल चौक परिसरात उघड्यावर शौचास बसतात. मात्र बुधवारी सकाळी या पथकाने एकालाही उघड्यावर शौचास बसू दिले नाही. या भागातील ज्यांनी वैयक्तिक शौचालय बांधकामाचे अनुदान उचलले आहे, त्या सर्वांना नोटिसा देण्यात आल्या. शिवाय, त्यांच्याकडून तत्काळ बांधकाम करण्याचे हमीपत्र लिहून घेण्यात आले असून, मनपाने बुधवारी दिवसभरात १००७ लाभार्थ्यांना नोटिसा बजावल्या. बांधकाम पूर्ण न केल्यास गुन्हे दाखल करण्याची तंबीही यावेळी देण्यात आली.