लातूर : ‘लोकमत’चा ३३ वा वर्धापन दिन १९ जानेवारी रोजी साजरा होत असून, यानिमित्त एमआयडीसीतील भवनच्या प्रांगणात स्नेहमिलन सोहळा सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार आहे. वाचकांच्या उदंड पाठिंब्यावर ‘लोकमत’ने सदैव उत्कृष्टतेचा ध्यास घेतला आहे. ‘लोकमत’ एक विचारधारा असून, लातूरकरांच्या दैनंदिन जीवनातील जगण्याचा एक भाग झाला आहे. सुसंस्कृतपणा, जिव्हाळा, प्रेम ‘लोकमत’ने सदैव वृद्धिंगत केला आहे. त्याचा हा स्नेहमेळावा वाचकांच्या उपस्थितीत ‘लोकमत’च्या प्रांगणात सोमवारी होत आहे. वाचकांचा स्नेह वाढावा, प्रेमाची व विश्वासाची मैत्री अधिक घट्ट व्हावी म्हणून ‘लोकमत’ सदैव प्रयत्नशील राहिले आहे. भविष्यातही ‘लोकमत’ लातूरकरांच्या सुख-दु:खात सहभागी होईल. सर्वांच्या हाकेला साथ देऊन स्नेहाचे नाते टिकविण्यासाठी कटिबद्ध आहे. लातूर शहरात सलोखा आणि भाईचारा रहावा, यासाठी ‘लोकमत’ने कायम विधायक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच वाचकांचे प्रेम ‘लोकमत’ला मिळाले आहे. हे नाते अधिक घट्ट व्हावेत, म्हणून स्नेहमेळावा आयोजिण्यात आला आहे. वाचकांच्या पाठिंब्यावरच ही वाटचाल सुरू असून, स्नेहमेळाव्याचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. वाचकांनी या स्नेहमेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून, शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्याच्या विकास प्रश्नाबाबत ‘लोकमत’ने कायम सकारात्मक आणि राजकारणविरहित भूमिका घेतली आहे. जिल्हा निर्मिती, विभागीय एस.टी. डेपो, रेल्वेचे विस्तारीकरण, आयुक्तालयाचा प्रश्न अशा एक नव्हे, अनेक प्रश्नांसाठी ‘लोकमत’ने लातूरकरांना साथ दिली आहे, नव्हे लातूरकरांसोबत ‘लोकमत’ कायम राहिला आहे.
‘लोकमत’च्या प्रांगणात आज स्नेहमिलन सोहळा
By admin | Updated: January 19, 2015 00:57 IST