नांदेड : लोकमत सखीमंच प्रस्तुत लावणी दुरंगी सामना या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, २ मार्च २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजता ए़ के़ संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाका येथे करण्यात आले आहे़लोकमत सखीमंच महाराष्ट्राची लाडकी लावणी या कार्यक्रमाचे आयोजन महिलांसाठी करते़ यावर्षीचा पहिला कार्यक्रम हा लावणी दुरंगी सामना हा आहे़ या कार्यक्रमांतर्गत मृणाल कुलकर्णी आणि चतुर्थी पुणेकर या नृत्यांगणा बहारदार लावणी सादर करणार आहेत़ हा कार्यक्रम फक्त सखीमंच सदस्यांसाठी असून सदस्यांनी येताना २०१६ चे सखीमंचचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे़ लहान मुलांना प्रवेश नाही़ तसेच २०१६ ची सदस्यता नोंदणी कार्यक्रमस्थळी ४ ते ५ पर्यंत सुरू राहील़ (प्रतिनिधी)
आज सखींसाठी बहारदार लावणी दुरंगी सामना
By admin | Updated: March 1, 2016 23:59 IST