शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

‘सचखंड’ येथे आज श्री गुरुगोविंदसिंघजी जयंती

By admin | Updated: January 15, 2016 23:38 IST

अमरिकसिंघ वासरीकर, नांदेड श्री गुरुगोविंदसिंघजी जयंतीनिमित्त सचखंड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी शहरातून नगरकीर्तन काढण्यात येणार आहे.

अमरिकसिंघ वासरीकर, नांदेडश्री गुरुगोविंदसिंघजी जयंतीनिमित्त सचखंड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी शहरातून नगरकीर्तन काढण्यात येणार आहे.सचखंड येथे श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या जयंतीनिमित्त एक आठवडा आधीपासूनच प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येते. गुरुद्वारा परिसरात विविध ठिकाणी सप्ताह पाठांचेही आयोजन करण्यात आले आहे. या पाठांची समाप्ती १६ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त विशेष कीर्तन दरबारचे आयोजन करण्यात आले असून रात्री नऊ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हे कीर्तन दरबार चालणार आहे. यात देश-विदेशांतील नामवंत रागी जत्थे आपली हजेरी लावणार आहेत. मध्यरात्री अडीच वाजता मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या अरदासनंतर गुरपुरबचा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी श्री गुरुगोविंदसिंघजींच्या जीवनावर आधारित कथा सांगण्यात येणार आहे. परिसरात विविध ठिकाणी मिष्ठान्नाचे लंगर लावण्यात आले आहे. चार वाजता सचखंड येथून विशेष नगरकीर्तन निघणार आहे. यात घोडे, निशान साहिब, गतका आखाडे, कीर्तनी जत्थे व ग्रामीण भागातील भजनी मंडळ सहभागी होणार आहेत. हे नगरकीर्तन शहीद भगतसिंघरोड मार्गे जुना मोंढा, संतबाबा निधानसिंघजी चौक, महावीर स्तंभ, हनुमान पेठ, शिवाजी पुतळा, गांधी पुतळा, चिखलवाडी मार्गे सचखंड येथे येणार आहे. रात्री आतीषबाजी केली जाणार आहे. जयंतीसाठी देश-विदेशांतून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरु सचखंड येथे आले असून यात्रेकरुंच्या निवासाची व्यवस्था विविध यात्री निवासात करण्यात आली आहे. यानिमित्त गुरुद्वारा परिसरात रोषणाई करण्यात आली ही रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे़ गुरुद्वाराचा अंतर्गत भाग फुलांनी सजवण्यात आला आहे. श्री गुरुगोविंदसिंघजींचा जन्म बिहार राज्यातील पटना येथे झाला. त्यांनी अनंतपूर साहिब (पंजाब) येथे १६९९ मध्ये खालसापंथची स्थापना केली.देश व धर्मासाठी आपले पिता श्री गुरुतेग बहाद्दरजी व चार पुत्रांचे बलिदान देवून ते नांदेड येथे आले. १७०८ मध्ये नांदेड येथे गुरुग्रंथ साहिबजींना गुरुपद बहाल करुन स्वत: सचखंड गमन केले.