औरंगाबाद : दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना उद्यापासून ‘आयटीआय’चे कर्मचारी मोबाईलवर संपर्क साधून प्रवेश अर्ज निश्चित (कन्फर्मेशन) करण्यासाठी सूचना देणार आहेत.राज्यात १ लाख २५ हजार ‘आयटीआय’च्या जागांसाठी २ लाख ३१ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेली असून, आजपर्यंत १ लाख ४२ हजार विद्यार्थ्यांनी जवळच्या ‘आयटीआय’मध्ये जाऊन आपले प्रवेश अर्ज निश्चित केले आहेत. औरंगाबादेतील एकट्या मुलांच्या ‘आयटीआय’साठी १,२१६ जागांसाठी १,६०० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज निश्चित केले आहेत. २२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आॅनलाईन नोंदणी व अर्ज निश्चिती करावी लागेल. यासाठी उद्यापासून औरंगाबादेतील ‘आयटीआय’चे कर्मचारी आॅनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईलवर संपर्क साधून त्यांना आपले अर्ज निश्चित करण्यासाठी सूचना देणार आहेत. विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेली पावती व प्रवेश अर्ज निश्चित करण्याचे शुल्क जवळच्या कोणत्याही ‘आयटीआय’मध्ये भरल्यानंतर प्रवेश नोंदणी पावतीवर त्या आयटीआयचा शिक्का घेणे बंधनकारक आहे. २४ जुलै रोजी संकेतस्थळावर प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
आजपासून विद्यार्थ्यांना देणार मोबाईलवर प्रवेशाची सूचना
By admin | Updated: July 18, 2014 01:53 IST