जालना : लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब व येथील शेमरॉक यंगिस्तान स्कूल यांच्या संयुक्त सहकार्याने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फेस्टिवल आर्ट कॉम्पिटिशन २०१५ चे आयोजन रविवारी (२१ डिसेंबर) करण्यात आले आहे. शहरातील लोखंडी पुलाजवळ असलेल्या मुथा बिल्डींग परिसरातील शेमरॉक यंगिस्तान स्कूलमध्ये आयोजित या फेस्टिवलमध्ये इयत्ता पहिली ते दुसरी गटातील विद्यार्थ्यांसाठी सकाळी १० ते ११.३० वाजता ग्रिटींग कार्ड हा तर ३ ते ४ थी गटातील विद्यार्थ्यांसाठी याच वेळी पॉट डेकॉरेशन हा विषय ठेवण्यात आला आहे. ५ वी ते ७ वी गटातील विद्यार्थ्यांसाठी ११.३० ते दुपारी १ वाजेदरम्यान ग्रिटींग कार्ड विथ इनव्हीरोमेंट फ्रींडली मटेरियल हा तर दुपारी १ ते २.३० वाजेदरम्यान ८ वी ते १० च्या गटातील विद्यार्थ्यांसाठी क्रिसमस ट्रि डेकोरेशन हा विषय ठेवण्यात आला आहे. याकरीता सोबत क्राफ्ट पेपर आवश्यक आहे. ग्रिटींग कार्ड विषय असणाऱ्यांसाठी ए.३ साईजची ड्रार्इंग शीट आवश्यक आहे. शीट आयोजिकाकडून दिले जाईल. तसेच उर्वरित विषय असणाऱ्यांसाठी डेकोरेशन साहित्य मुलांनी आणणे आवश्यक राहिल.कॅम्पस क्लबचे जे विद्यार्थी सदस्य नाहीत, त्यांच्यासाठी ५० रूपये फिस राहणार आहे. नाव नोंदणीसाठी ९०११४९८७७९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आज जालन्यात फेस्टीवल आर्ट कॉम्पिटिशन
By admin | Updated: December 21, 2014 00:06 IST