शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

नमकीनच्या पुड्यात तंबाखू, पानमसाला

By admin | Updated: September 11, 2014 01:23 IST

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात गुजरातहून नकली खवा, गुटखाच नव्हे तर सुगंधी तंबाखूही अवैधरीत्या आणली जात आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात गुजरातहून नकली खवा, गुटखाच नव्हे तर सुगंधी तंबाखूही अवैधरीत्या आणली जात आहे. रविवारी ७ रोजी ७ लाख १२ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू व पानमसाला जप्त केल्यानंतर आज बुधवारी पुन्हा एकदा १ लाख ५ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. मागील चार दिवसांत ८ लाख १७ हजार रुपयांची तंबाखू जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे राज्यात गुटखा, पानमसाल्यासोबतच सुगंधी तंबाखू विक्रीवरही बंदी आहे. बुधवारी १० रोजी शहरात सुगंधी तंबाखू येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद शहा यांना मिळाली होती. त्यानुसार सकाळी ९ वाजेपासून दौलताबाद टी-पॉइंटवर अन्न व औषध प्रशासनाचे पथक तयार होते. गुजरातहून आलेली पंजाब ट्रॅव्हलची गाडी या पथकाच्या नजरेस पडली. पथकाने त्या गाडीचा पाठलाग केला. शहरात येताच हा माल उतरविण्यात आला. त्यावेळीस शेख फईम शेख इब्राहीम (रा. नवाबपुरा) हा इसम तो माल घेण्यासाठी येताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. नमकीन असे लिहिलेल्या प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये एक-एक किलोची सुगंधी तंबाखूची ३० पाकिटे ठेवण्यात आली होती. यासंदर्भात अन्नसुरक्षा अधिकारी गजानन मोरे यांनी सांगितले की तंबाखू, चांदीचे वर्क, मसाले व सुगंधी पदार्थ मिक्स करूनही सुगंधी तंबाखू तयार करण्यात आली आहे, अशी सुगंधी तंबाखू विक्रीला राज्यात बंदी आहे. तपासणीत अन्नसुरक्षा अधिकारी अमर सोनटक्के यांचेही सहकार्य लाभले. क्रांतीचौक पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.नारेगावातील डंपिंग ग्राऊंडमध्ये तंबाखू गुटखा नष्ट करणारमागील चार दिवसांत जप्त करण्यात आलेली ८ लाख १७ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू व ११ लाख ६१ हजार रुपये किमतीचा गुटखा नारेगाव येथील डंपिंग ग्राऊंड येथे नष्ट करण्यात येणार आहे. प्रथम तंबाखू व गुटखा मातीत मिसळण्यात येणार आहे. जेसीबीच्या साह्याने मोठे खड्डे करण्यात येऊन त्यात ते टाकून देण्यात येणार आहेत. जप्त करण्यात आलेला खवाही अशाच पद्धतीने नष्ट करण्यात आला आहे.