औरंगाबाद : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने औरंगाबाद-तिरुपती-औरंगाबाद साप्ताहिक विशेष रेल्वेच्या तीन फेऱ्या वाढविल्या आहेत. १५, २२ आणि २९ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता औरंगाबाद स्थानकाहून ही रेल्वे निघेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता ही रेल्वे तिरुपती येथे पोहोचेल. जालना, परभणी, नांदेड, सिकंदराबाद, विजयवाडामार्गे ही रेल्वे तिरुपती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी १६, २३ आणि ३० आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.१० वाजता तिरुपतीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता औरंगाबादेत पोहोचेल.मोटारसायकल अपघातात वृद्ध ठारऔरंगाबाद : धावती मोटारसायकल घसरल्यामुळे जखमी झालेल्या इस्माईल बनेमिया अत्तार (६५, रा. ईदगाहनगर, वैैजापूर) यांचा उपचार सुरू असताना ६ आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजता घाटीत मृत्यू झाला. हा अपघात २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वैैजापूर येथे घडला.