शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अकरा कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन थकित

By admin | Updated: January 20, 2017 00:19 IST

येडशी : येथील ग्रामपंचायतीच्या ११ कर्मचाऱ्यांचा मागील चार महिन्यांपासून पगार थकला

येडशी : येथील ग्रामपंचायतीच्या ११ कर्मचाऱ्यांचा मागील चार महिन्यांपासून पगार थकला असून, पगारीअभावी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे़ दरम्यान, ग्रामपंचातयीच्या उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या विविध करापोटी थकीत रक्कम ८८ लाख रूपये असून, ही रक्कम वसुलीसाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे़ग्रामपंचायतीच्या विविध कामांसाठी ११ कर्मचारी कार्यरत आहेत़ मात्र, चार महिन्यावंपासून या कर्मचाऱ्यांचया पगारी थकीत आहेत़ याशिवाय गावातील नळ योजना बंद पडली असून, पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ अनेक पथदिवे बंद असून, ग्रामस्थांना रात्रीच्यावेळी रस्ता शोधण्यासाठी बॅटरीचा वापर करावा लागत आहे़स्वच्छतेसह इतर समस्या आ वासून उभा आहेत़ वीज, पाणी, रस्ता अशा मुलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांची गैरसोय होत आहे़एकीकडे समस्या निर्माण झाल्या असल्या तरी दुसरीकडे जवळपास एक कोटी रूपयांचा विविध कराची रक्कम थकीत आहे़ येडशी ग्रामपंचायतीला चमडा बाजार, आठवडा बाजार, दुकान भाडे, रामलिंग यात्रा कर, गामपंचायत गाळे अशा विविध मार्गानी उत्पन्न मिळते़ याशिवाय घरपट्टी, पाणीपट्टी, वीज कर, आरोग्य कर विविध प्रकारचा एकूण ८८ लाख रुपये कर थकला आहे़ परिणामी ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती कोलमडल्याचे सांगण्यात येत आहे़ येडशी ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे ३ हजार ५२५ कर मागणी खातेदार आहेत. यामध्ये गावातील घराची घरपट्टी व पाणीपट्टी ६७ लाख ८५० तसेच शासकीय कार्यालयामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ८ लाख ६ ५ हजार ४३१ रुपये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ३ लाख ३६ हजार ३२०, भारत संचार निगम लिमिटेड ५४ हजार ४८८ बसस्थानक १ लाख ३५११३ असा एकूण ८८ लाख रुपये कर थकला आहे. या करांची वसुली करून मुलभूत समस्या सोडविण्यासह कर्मचाऱ्यांच्या पगारी कराव्यात, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)