शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
7
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
8
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
9
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
10
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
11
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
12
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
13
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
14
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
15
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
16
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
17
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
18
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
19
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
20
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...

धार्मिक स्थळांसाठी कालबद्ध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:32 IST

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई करण्याबाबत शुक्रवारी धार्मिक स्थळ समितीने कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई करण्याबाबत शुक्रवारी धार्मिक स्थळ समितीने कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला. लवकरच मनपाकडून १,०५५ धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांचे आक्षेप, सूचना आणि हरकती मागविण्यात येणार आहेत.धार्मिक स्थळ समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष तथा मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी नमूद केले की, न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई सुरूच राहणार आहे. प्रत्येक आठवड्याला खंडपीठात कारवाईचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. शुक्रवारी समितीचे सर्व १३ सदस्य आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत खंडपीठाच्या आदेशाचा तपशील समजावून सांगण्यात आला. त्यानंतर सदस्यांच्या सूचना ऐकून घेण्यात आल्या. १,१०१ धार्मिक स्थळांपैकी ४६ धार्मिक स्थळे मनपाने आतापर्यंत काढली आहेत. उर्वरित १,०५५ धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध करण्यावर एकमत झाले. यादी प्रसिद्ध झाल्यावर सूचना, हरकती आणि आक्षेप आठ दिवसांमध्ये मागविण्यात येतील. नागरिकांकडून प्राप्त आक्षेपांची छाननी करण्यात येईल. ‘अ’ प्रवर्गातील ५०८ धर्मिक स्थळे नियमित करण्यासारखी आहेत. ‘ब’ प्रवर्गातील ५८० पेक्षा अधिक धार्मिक स्थळे आहेत. यातील ३६८ धार्मिक स्थळे खाजगी जागेवर आहेत. खाजगी जागेवरील धार्मिक स्थळे काढण्याचा काही संबंध येत नाही. संपूर्ण वर्गीकरण केल्यावर महापालिका अंतिम यादी जाहीर करणार आहे. रस्त्यात अडसर ठरणारे, मनपाच्या किंवा शासकीय जागेवर असलेले आणि जी धार्मिक स्थळे नियमित होऊच शकत नाहीत ती यादी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका परत एकदा कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.